अस्तित्व
महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री […]