शरणपत्रे!
राजकारण्यांनी जेव्हापासून शिक्षकांना पदरी नोकरीला ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून शिक्षकांनी शरणपत्रे लिहून द्यायला सुरुवात केली. पुराणकाळात सुरुवात झाली द्रोणाचार्यांपासून ! त्यांना धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांसाठी – कौरव-पांडवांसाठी गुरु (शिक्षक) म्हणून नेमले. आणि मग द्रोणाचार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात (कदाचित) मनाविरुद्ध ओढले गेले-राजनिष्ठेचे पालन म्हणून ! […]