बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ३ – सावरकरांचे धैर्य
सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” […]