इतिकर्तव्यता
आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे. […]