नवीन लेखन...

प्रवास पंख्यांचा

पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं. […]

कापूसखेड नाका, स्टाफ क्वार्टर नं ३/४

आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे. […]

पानसुपारी

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू […]

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

मला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो. माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे , मी सांगतोय तेच बरोबर , किंवा मग , मला काही शिकवायचं नाही , मला सगळं समजतं , प्रत्येक गोष्टीत मला […]

माझे शिक्षक- भाग ५ (प्राध्यापक) (आठवणींची मिसळ १९)

शिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व […]

काच कांगऱ्या

आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी […]

बदललेल्या जागा आणि गोष्टी

मित्रांनो, आज आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलून गेल्यायत. आपलं रहाणीमान, आवडी निवडी, आपली मानसिकता, आनंदाच्या व्याख्या सगळं सगळंच खूप बदलून गेलंय. कारण काय? तर आम्हाला आजच्या युगाबरोबर चालायचंय ना ! पूर्वी अगदी नेमाने करत असलेल्या अनेक गोष्टी आज आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जाऊ लागल्यायत, किंवा असु दे ! जाऊ दे ! ठीक आहे, चालतंय ! असा दृष्टिकोन […]

खर आणि खोटं

आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो. […]

लोकरंगभूमीचे साक्षेपी संशोधक: डॉ. प्रकाश खांडगे

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे डॉ. खांडगे गेली बारा वर्षे शिकवत आहेत. पीएच.डी.चे मार्गदर्शन असलेल्या डॉ. खांडगेंच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी संशोधन करत आहेत.‘खंडोबाचं जागरण’ या पुस्तकासाठी त्यांना 2010चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथांचा वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. या खेरीज शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कलादान पुरस्कार मिळवलेल्या डॉ. खांडगेंनी भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या महापरिषदेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. 2010मध्ये त्यांनी चीनमधील बीजिंग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोकसंगीतावर निबंध सादर केला तर याचवर्षी अमेरिकेतील नॅशव्हिला येथे आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोकसंस्कृती परिषदेत भारताचे नेतृत्व करताना लोककलांवर निबंध सादर केला. […]

कन्नुदादा ( एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली. […]

1 82 83 84 85 86 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..