ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील माझे योगदान
गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे. […]