भारतमातेच्या वीरांगना – ५६ – नेली सेनगुप्ता
१९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले. […]