ग्रामीण भागातील नागपंचमी
श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….। […]