भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन
अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले. […]