नवीन लेखन...

मुक्त विचार

मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते. […]

दृष्टिकोन

आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.        […]

दिग्दर्शकांचे ठाणे

लेखकाच्या कल्पनेमधून कागदावर उतरलेलं नाटक, प्रेक्षकांपर्यंत दृश्य स्वरूपात आणण्याची कामगिरी बजावण्याची जबाबदारी ज्याची असते आणि ही जबाबदारी निभावताना आपल्या प्रतिभेनं, कलाकारांच्या मदतीनं, तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन जो नाटकात प्राण फुंकतो तो दिग्दर्शक. ठाण्याच्या रंगपरंपरेमध्ये दिग्दर्शकीय प्रतिभेनं स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या कमी नाही. राज्य नाट्यस्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत दिग्दर्शनाची जादू दाखवणाऱ्या ठाण्याच्या दिग्दर्शकांची गणनाच करायची झाली तर यशवंतराव पालवणकर यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. […]

सोलापूर फाइल्स – श्रवणानंदाच्या नोंदी !

एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात. […]

दूर न पोहोचलेले सूर (आठवणींची मिसळ – भाग ८)

आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला. […]

उगाच काहीतरी – १

काल बऱ्याच वर्षांनी शाळेतला मित्र भेटला. फॉर्मालिटी प्रमाणे जुन्या गोष्टी, आठवणी झाल्या. बऱ्याच गप्पा झाल्या. त्याला विचारलं ” काय करतोस आजकाल?” ” आय हॅव क्वाईट ए फिव व्हेंचर्स ऑफ माय ओन” ” हं..ग्रेट. म्हणजे एंटरप्रेन्युर झालायेस एकुण. ” – मला कौतुक वाटलं. “आंत्रप्रन्योर…आंत्रप्रन्योर” ” ते शरद तांदळे यांचं पुस्तक ना. त्याची पण एजन्सी आहे का तुझी. […]

जहाँ चार यार मिल जाए

मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! […]

१९५०च्या आधीची अंधेरी (आठवणींची मिसळ – भाग ७)

१९५०च्या आधीची अंधेरी ही तडीपार लोकांचे गांव, म्हणजेच मुंबईत यायला बंदी केलेल्यांच गांव.छोटे रस्ते, मिणमिणते दिवे किंवा दिव्यांचा अभाव यामुळे आपलं अंधेरी नाव सार्थ करणारी.आमच्या मालकाच्या दोन मजली बंगल्याच नांव होतं “नीळकंठ कॉटेज”.खरं तर मागचं आउटहाऊस, जिथे आम्ही रहात होतो, तेच फक्त कॉटेज म्हणण्यासारखं होतं. […]

ठाण्याचे अभिनेते

सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा. […]

माझा लेखन प्रवास (आठवणींची मिसळ – भाग ६)

अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले. […]

1 91 92 93 94 95 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..