नाट्याभिमानी शशी जोशी
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली […]