नवीन लेखन...

म्हातारा न इतुका

१९९२ साली राॅबर्ट जेम्स वाॅलर यानं लिहिलेली, त्याच नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीची ९.५ दशलक्षची विक्री होऊन, अल्पावधीतच ‘बेस्टसेलर’ ठरली. १९९४ साली क्लींट ईस्टवुडने त्यावर चित्रपट करायचे ठरविले. ५२ दिवसांच्या शेड्युलच्या, पेपरवर्कनुसार शुटींग सुरु झाले. सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने, दहा दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण झाले. २ जून १९९५ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाने १८२ दशलक्ष डाॅलर्सचा अभूतपूर्व व्यवसाय केला!! […]

बालमोहन विद्यामंदिर

दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता. […]

आईचा जोगवा जोगवा

काळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत. […]

रिव्हर ऑफ नो रिटर्न

मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी, लाॅस एंजलिस येथे झाला. तिचं बालपण मात्र अनाथाश्रमात गेलं. नंतर अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिनं माॅडेलिंग सुरु केलं. १९४६ साली तिनं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चार वर्षांच्या परिश्रमानंतर तिला प्रसिद्धी मिळू लागली.१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायगारा’ चित्रपटाने ती प्रकाशझोतात आली. १९५५ मधील तिच्या ‘सेव्हन इयर इच’ या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. याच चित्रपटावरुन ‘सखी शेजारिणी’ हे मराठी नाटक बेतले होते. १९५९ सालातील ‘समलाईक इट हाॅट’ या चित्रपटाने तिला सर्वोच्च असा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळवून दिला. […]

गरीबीला अश्रूंचे वावडे

“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं. […]

आठवणींचे जीर्णोद्धार – “धूप आने दो” (गुलज़ार)

जुन्या,विस्मृत होत चाललेल्या अधाशीपणे मी ती २३४ पाने दिवसभरात वाचून संपविली आणि गेले काही दिवस रवंथ करीत बसलो. २५-२६ लेखांपैकी मला दोनच लेख जिवलग वाटले- एक ” मीनादीदी ” तर दुसरा “साहिर आणि जादू ” ! […]

वो कौन था?

‘मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला. […]

श्री लक्ष्मीनृसिंह संस्थान, वेलींग

लक्ष्मीनृसिंहाच्या गाभाऱ्यात स्नान करून ओल्या वस्त्रानेच जाता येतं. तात्या(वडील) सकाळी लवकर उठून आंघोळ करून तळ्यातल्या पाण्याची कळशी भरून घेऊन गाभाऱ्यात यायचे. गुरुजींचा अभिषेक सुरू असायचा. देवाच्या मूर्तीवर कळशीतल्या पाण्याचा अभिषेक करायचा. पुढे देवाची साग्रसंगीत पूजा व्हायची. मूर्तीवर चांदीचा मुखवटा चढवून फुलांनी सुंदर सजवलं जायचं. गाभाऱ्याबाहेरच्या जागेत बसून पूजेचा सोहळा पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असायचा. […]

सीमाभिंती

या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे. […]

पहिलीपासूनचे सोबती

माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला.. […]

1 97 98 99 100 101 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..