नवीन लेखन...

फसवे रंग

आज वर्गातलं वातावरण एकदम रंगीबेरंगीच होतं. रंगीत कागद, रंगीत पेनं, पेन्सिली, खडू आणि चित्रविचित्र रंगांची स्केच पेन्स. आणि विशेष गंमंत म्हणजे मुलांनी पण आज रंगीत कपडेच घातले होते. मला काही समजेना? “आज काय सगळ्या मुलांचा वाढदिवस आहे की काय?” असं विचारताच मुलं म्हणाली,“आज कलर डे आहे! म्हणून आज सगळंच कलरफूल!” सिमरन म्हणाली,“आजचा खेळसुध्दा रंगीबेरंगी रंगांचा रंगीत […]

रातराणी

पहाट झाली. काळपट आकाश उजळू लागलं. गार वारा भिरभिरू लागला. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. पाने सळसळली.. .. झाडांची झोप उडाली. फुलं हळूहळू फुलू लागली.. .. वाऱ्यावर डोलू लागली. आणि… एका झाडाला वाटलं, ‘छे! हे आता रोजचंच झालंय. रोज-रोज का सकाळी फुलायचं आणि वाऱ्यावर डोलायचं? हे सारं बदललंच पाहिजे. रोज पहाट आणि रोज रोज किलबिलाट. नको हा […]

बालकांसाठी काव्य मेवा

बालकांनी खावा छान छान मेवा वाटावा त्यांना सदा हवा हवा शाब्दिक मेवा बुध्दीचा ठेवा येता-जाता खावा खावा खावा मित्र-मैत्रिणींना द्यावा द्यावा द्यावा — सुधा नांदेडकर

शाळेतला पावसाळा

रैनाने पटापट आवरलं तरी आता तिला शाळेत जायला उशीर होतंच होता. सकाळी बरोब्बर आठ वाजून पाच मिनिटांनी तिची स्कूल बस येते. आठ वाजले तरी रैनाची आंघोळ व्हायची होती. त्यातच तुला “हे करायला नको, तुला ते करायला नको’ अशी आईची आरती सुरू होतीच. आता ऊशीर झाल्याने शाळेत मार खावा लागेल त्यापेक्षा प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने […]

लिटमस टेस्ट !

आता बालसाहित्याचे आयाम बदलले आहेत! कारण आता मुलांच्या भोवतालचं विश्वच झपाट्याने बदलत आहे. त्यांची ‘जगण्याची भाषा’ ही आता वेगळी आहे! — जागतिकीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे ‘मूल’ हे मार्केटिंगचा विषय झालं! मुलाला काय पाहिजे ह्याचा सारासार विचार न करता, कुठला माल खपला पाहिजे ह्याचाच विचार करुन त्याचा आकर्षक धबधबा मिडीयाच्या मदतीने ग्रामीण तसेच नागरी भागातून वाहू लागला. […]

उकळता प्रयोग

काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. […]

गाढवू

उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं. दुपारची वेळ होती. गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं. उन्हाने पाठ भाजायला लागली. कानातून वाफा येत आहेत असं वाटू लागलं. घसा सुका पडला. जीभ कोरडी झाली. डोळ्यांची आग-आग होऊ लागली. शेपटी तापून-तापून पिळपिळीत झाली. मग त्याने उड्या मारल्या.. लाथा झाडल्या.. झाडाला धरुन दोन […]

मस्तीखोर फुगे

आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून […]

शिक्षणाचे वास्तव आणि शिक्षकाचे मत

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. त्या दोन जिल्ह्यात आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की ‘शिक्षकांच्या […]

सुटीतले घर आणि घरातली सुटी

सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले ‘पालक वारे’ कुठले व ‘मूल वारे’ कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. ‘सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा […]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..