माझ्या एका मित्राच्या आजोबांनी टायटॅनिक पाहिलं होतं. त्यांना सुरूवातीपासूनच माहिती होतं की ते जहाज नक्की बुडणार आहे. त्यांनी लोकांनी त्यात चढू नये म्हणून खूप विनंती केली. पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा ते लोकांना सांगत राहिले. शेवटी त्यांनी खूप आरडाओरड केली तेव्हा………. त्यांना उचलून थिएटर च्या बाहेर टाकून देण्यात आले. –अमोल पाटील
सोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे, […]
जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं. […]
आमच्या लहानपणी , “मुकाट्याने जेव बरं, आणि नंतर काय ती बडबड कर…. “ हे वाक्य जेवताना कमीतकमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच. म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र पाटावर बसायचो, पण आजच्यासारखं गप्पा मारत, हास्य विनोद करत जेवण होत नसे. बोलत बसलं की, तेव्हढ अन्न कमी जातं पोटात, ही आयांची धारणा होती. त्यामुळे मोजकच , जरुरीपुरतं बोलायचं […]
आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज […]
साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत. […]
लेट सिटींग डिस्कलेमर : हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात. आपल्या भारतीयांचे काही वैशिष्ट्य असतात म्हणजे भारतीय मेहनती असतात. प्रामाणिक असतात, आणि लवचिक असतात.याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या कॉल सेंटर वगैरे. परदेशी वेळेच्या हिशोबाने आपल्याकडे काम करण्याच्या जी लवचिकता आहे त्यामुळेच आपल्याकडे bpo आणि कॉल सेंटर एवढ्या प्रमाणात स्थापित होऊ शकले […]
हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते- […]
गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब. वरच्या माळ्यावर […]
दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत. अशाच एका थिएटरमध्ये संगीत साथ देणारे एकाच ठिकाणी बसून कंटाळले की, त्यांना पाय मोकळे करण्यासाठी संधी देऊन स्वतः पेटी वाजवणारा एक तरुण होता. तो गंमत म्हणून हे […]