राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे. […]
पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली. […]
महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री […]
समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, […]
चार दिवसांपूर्वी मी आॅफिसला पोहचल्यावर मोबाईल पाहिला, तर एक ‘मिस्ड काॅल’ येऊन गेला होता. मी तो नंबर लावल्यानंतर मला पलिकडून एका वयस्कर स्त्रीचा आवाज आला, ‘तुम्ही नावडकरच बोलताय ना?’ मी होकार दिल्यावर त्या मावशी पुढे बोलू लागल्या, ‘मी सुधा बोलतेय, मला तुम्ही व्हॅलेंटाईनवर लिहिलेलली कविता फार आवडली. ‘मी त्यांना समजावून सांगितले की, ती कविता नसून कथा […]
आधारवड रविवारची सकाळ, अनिकेत मस्त लोळत बेड वर आडवा झालेला, आज जरासा अळसावलेला! तस सॉफ्टवेअर मध्ये जॉब करणारे सगळेच शनिवार रविवार अशेच मुर्दाडासारखे पडून असतात! त्यात नुकतंच त्याच्या टीमच रिलीज झालेलं.काल रात्री तेच सेलिब्रेशन करून तो लेट नाईट आलेला! तो साखरझोपेतच होता तेच त्याची लाडाची लेक मुग्धा आली धावत आणि बसली अंगावर, घोडा घोडा चालू झाला! […]
काही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय. […]
देशमुख साहेबांना रात्री दीड वाजता छातीत दुखू लागले. त्यांनी विराजच्या आईला उठवले आणि छातीत दुखतंय असं सांगितलं. गेल्याच आठवड्यात पारकर साहेबांच्या पण रात्री छातीत दुखू लागले होते, पण त्यांना ॲसीडीटी झाली असेल असं समजुन मुलाने अँटॅसिड पाजले आणि झोपायला सांगितले. रात्री झोपलेले पारकर साहेब सकाळी उठलेच नाहीत. त्यांचा मुलगा नंतर ऊर बडवून मीच बाबांना मारलं, त्यांना […]
गेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते. काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ […]