दत्तावरील अभंग तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।। माथां शोभे जटाभार । अगी विभूती सुंदर ।। शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।। नमन माझे गुरुराय । महाराजा दत्तात्रया ।। तुझी अवधूत मूर्ती । […]
नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात कृश आहे व असे सांगतात की जेव्हा हा हात गळून पडेल तेव्हा नैसर्गिक उत्पात घडतील. नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळून पडतील व बद्रीविशालचे मंदिर कायमचे बंद होईल आणि मग ‘भविष्यबद्री’ बद्रीनाथ म्हणून पुजला जाईल. नरसिंह मंदिराजवळ दुर्गामंदिर आहे. या मंदिरात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुशमांडा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी व सिद्धी अशा […]
तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही. […]
ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात. पशुपक्ष्यांची भाषा समजत नाही पण दोन पायाच्या माणसाची भाषा त्याचे वागणे व दैनंदिन जीवन हा एक चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. मला काही वेळा असे वाटते की या समाजामध्ये वावरणाऱ्या मानवाचे आपण काहीतरी देणे आहोत. आयुष्यमान जगत असताना प्रत्येक […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. वि. शं. चौघुले यांनी लिहिलेला हा लेख गेल्या काही दशकांत मराठीतील संतसाहित्याचा परामर्ष समीक्षक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत, तत्त्वज्ञ या सर्वांना आपापल्या परीने घेतला आहे. कोणतीही सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-आध्यात्मिक परंपरा सातत्याने सुरू असते. तिच्या प्रवाहात नवीन भर पडत असते; वाटावळणे घेत ती पुढे सरकत असते. काळाच्या ओघात तिच्यात नवी भर पडते. म्हणून […]
असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या […]
सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” […]
श्रीहरीने आपले नेत्रकमल उघडले आणि विश्वकल्याणासाठी त्याने सुरू केलेल्या तपोसाधनेची सांगता झाली. चराचरात ॐकार भरून राहिला होता. एक छोटेसे बोरीचे झाड श्रीहरीवर सावली धरून उभे होते. तेच तपोसाधनेच्या काळात ऊन, वारा, पाऊस, बर्फापासून श्रीहरीचे रक्षण करत होते. श्रीहरीने ओळखले, ‘आदिमाया महालक्ष्मीच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपले रक्षण करत होती.’ तो विश्वाचा पालनकर्ता मनोमन सुखावला. प्रसन्न होऊन […]
त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या. […]
ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी […]