सुट्टीचं नाव निघालं की छोटयांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. सुट्टी म्हणजे आराम, सुट्टी म्हणजे रोजच्या धावपळीपासून सुटका, सुट्टी म्हणजे विरंगुळा ही समीकरणं सर्वांच्याच मनात रुजलेली असतात. रोजची कामे उरकत असताना देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात सुट्टीच्या तारखेकडे. आठवडयात शनिवार रविवारच्या मध्ये एखाद्या आडवारी सुट्टी आली की तो आठवडा मजेत जातो. आणि शनिवार रविवारला लागून […]
गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. […]
आपल्या सुमधुर गळ्याने आणि तितक्याच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून ठाण्याचे नाव संगीत रंगभूमीच्या प्रवाहात उजळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुवंती दांडेकर. पुण्याला सहस्रबुद्धेंच्या घरी जन्मलेल्या मधुवंतीला गायनाचा वारसा मिळाला तो आई मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून. आईच्या गळ्यातले गाणे लेकीच्या गळ्यात निसर्गदत्तपणे आले आणि मराठी नाट्यसंगीताच्या मैफिलीत एक कसदार सूर दाखल झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मधुवंतीचे शास्त्रीय संगीताचे […]
काळेभोर डोळे, काळा लांबसडक केशसंभार ही एकेकाळी सौंदर्याची प्रतीकं मानली जात होती. आज लांबसडक केशसंभार सांभाळायला, त्याची निगा राखायला वेळच उरलेला नाही. असो, आपली काळया रंगाशी सोबत अगदी जन्मल्यापासून असते. पूर्वी आणि काही प्रमाणात आजही नवजात बाळाला न्हाऊ माखु घातल्यावर कानाखाली काळं तीट आणि घरात पाडलेलं काजळ, डोळे भरून लावलं जायचं. काळं तीट दृष्ट लागू नये […]
आता इस्त्रीवालेही मोठे झालेत. एखाद्या मोठ्या खोलीत, एखाद्या मोठ्या दुकानांत आतां दोन ते तीन टेबलांवर इस्त्री चालू असते. बरेच इस्त्रीवाले आता बरोबरीने लाँड्री चालवतात. लाँड्रीचा धंदा कमी झाला तरी त्याची गरज आहेच. हा धंदा हळूहळू इस्त्रीवाले ताब्यात घेतायत. वूलन कपडे, सिल्कचे कपडे इ. चे ड्राय क्लिनींग असते. डिझायनर ड्रेससारखे कपडेही साफ करायला येतात. मुंबईत तरी इस्त्रीवाल्यांनी बहुसंख्यांचे कपड्यांची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. […]
पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये एफवाय बीए करणाऱ्या सोनालीला ट्रेकिंगचे वेड होते, पण आई बाबांचा तिच्या या छंदाला सक्त विरोध होता. मनिष आणि जयश्री या सुखवस्तू दांपत्याची ती एकुलती एक मुलगी. इतर मुलांसारखं तिने यूपीएससी करावं किंवा एनडीएची परीक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते भरपूर खर्चही करायला तयार होते. सोनालीचे सगळे मित्र पाचवीपासूनच बिझी झाले […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये चंद्रसेन टिळेकर यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम – तुकोबा – तुका आणि विं. दां. च्या भाषेत तुक्या देखील ! महाराष्ट्राच्या कडेकपारीत दुमदुमणारं नाव!! संत तुकाराम महाराज !!! मराठी साहित्याच्या दरबारातील मानाचा मानकरी… अफाट प्रतिभेचा प्रतिभावंत, महाकवी, भन्नाट अक्षरांचा स्वामी, भेदक शब्दकळा अवगत किमयागार… संत परंपरेतला कळस, ज्याची अभंगवाणी आसमंतात […]
आमच्याकडे धार्मिक विधी, नैमित्तिक पूजा अर्चा, एकादष्णी ,संकष्टी, श्रावणमासातील पूजा हे नित्याचच होतं. त्या लहानशा घरातला एक कोपरा देवघराने भरलेला होता. तात्यांची रोज भल्या पहाटे उठून पूजा चालायची. त्यांचं आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनही प्रचंड होतं. घरात इतरही साहित्य संग्रह प्रचंड होता. थोडक्यात सांगायचं तर वाचन श्रीमंती भरपूर होती. […]
भारतात प्रेमकथा फक्त त्यागाच्याच ऐकायला मिळतात, किंबहुना प्रेम म्हणजे त्याग, दुःख त्रास हे समिकरण इतके जोडले गेले आहे की त्या त्यागाने प्रेमाला बदनाम केले आहे. रामाची सीता, अहिल्या, लोपामुद्रा पासून ते थेट मुमताज महल पर्यंत सगळ्या कथा फक्त त्रास त्रास आणि त्रासाच्याच आहेत. खरंतर प्रेम हे जगणं आहे, प्रेमात आनंद आहे चैतन्य आहे पण या वेड्या त्यागाने प्रेमातली प्रेरणाच संपवून टाकली आहे. […]
मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात. […]