बाकी अशा इतर बऱ्याच जाहिराती आहेत जसे चित्रपटाच्या वेब सिरीज च्या आणि हो आजकाल न्यूज चॅनलचे पण होर्डिंग लागलेले असतात. मंत्र्यांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स, वगैरे वगैरे वगैरे. पण एक मात्र निश्चित आहे की जाहिराती शिवाय धंदा होणं शक्य नाही. […]
पुलंची मुलाखत घेण्यासाठी एकदा एक स्त्री पत्रकार आली होती. मुलाखत अगदी छान हसत खेळत झाली आणि आता आपल्याविषयी पेपरात काही बरं छापून येईल या कल्पनेने पुलंही पुलकित झाले. काही दिवसांनी त्या बाईंची समिक्षा पेपरात छापून आली, “पुलं स्वतःस पुरोगामी म्हणत असले तरीही त्यांचे पाय मातीचेच आहेत” पुलं बुचकळ्यात पडले, बाईंनी हे असं लिहिण्याचं कारण काय असावं? […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला हा लेख संत पुरुष म्हणजे ईशतत्त्वाचे वाटाडे. जन्मभर स्वतः वारेमाप कष्ट करून सतत त्यांनी जगाचेच हित चिंतिले आहे. ‘चिंता करीतो विश्वाचि ऽऽ’ या वचनातून समर्थ रामदास स्वामींनी ‘कल्याण करी रामराया ऽऽ’ या शब्दांतून समाजाबद्दल ईश्वरीशक्तीकडे अशीच करुणा भाकली आहे. जीवनाच्या अवघ्या जेमतेम दोन दशकाच्या उण्यापुऱ्या काळात […]
सावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो. […]
आयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते. […]
छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे […]
नाटक हा एक सांघिक कलाप्रकार आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ तर जमून यावा लागतोच, पण त्यांना नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा याची साथही मिळावी लागते. मात्र या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणारे रंगकर्मी नेहमी पडद्यामागे राहतात. त्यांचे चेहरे फार क्वचित प्रेक्षकांना दिसतात, पण त्यांचे कला कौशल्य, तंत्रावरील हुकूमत नाटकाची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित महत्त्वाची असते. अशाच काही […]
अशा प्रकारच्या वाक्यांची उधळण दोघंही एकमेकांवर करत असतात. आता ही वाक्य प्रत्येकवेळी असमंजसपणे म्हटली जातात असं मी मुळीच म्हणणार नाही. आपल्याला समजून घेणारा जोडीदार किंवा जोडीदारीण मिळालीय या घट्ट समजुतीचा शब्दातून व्यक्त होणारा तो परिपाक असतो. […]
प्रियेचा किती छान पत्ता सांगितला आहे त्या रसिक प्रियकराने, वा वा! सुंदर! तुला रस्त्यात पारिजातकाचा सडा पडलेला दिसला की तिथून डावीकडे वळ, पुढे नदीच्या किनाऱ्यावर केवड्याचा सुवास येईल, तिथे वेढा घालून बसलेल्या नागिणीला विचार, ती तुला माझ्या घराचा पत्ता सांगेल. किंवा वसंतात घरी येणाऱ्या प्रियकराला तू पहाटे पहाटेच तिथे पोहोच, सकाळी मोगरा तुला माझ्या घरी ओढून घेऊन येईल. […]
बायको अशिक्षित किंवा कमी शिक्षण घेतलेल्या अनेक जणी आहेत पण त्यांचा संसार उत्तम झाला आहे याची अनेक उदाहरणे आहेत ती केवळ विचारसरणी या मुळेच आणि तसेही नवरा बायको पेक्षा कमी शिकलेला नसावा असा नियम आहे का? […]