नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

संत तुकाराम: ऐहिकाकडून अलौकिकाकडे

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन […]

तळा ‘गाळातले ‘

मध्यंतरी आमच्या सोसायटीची सांडपाणी वाहून नेणारी ड्रेनेज व्यवस्था तुंबली. त्यातच पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचं पाणी, गटार भरून वहाणाऱ्या सांडपाण्यात मिसळून दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढू लागला. सोसायटीच्या केरकचरा, सफाई करणाऱ्याला विचारलं, त्याने असमर्थता दर्शवली, पण दुसऱ्या दिवशी दोन माणसांना या कामासाठी तो घेऊन आला आणि म्हणाला, “हे करून देतील काम”. काळया वर्णाचे, उघडे, किरकोळ शरीरयष्टी, चेहरा […]

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही. […]

उगाच काहीतरी – १७

सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी. […]

इतिकर्तव्यता

आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे. […]

सुख आले माझ्या दारी

अमेरिकेत महिनाभर मुलीकडे वास्तव्याला होतो. अमेरिका दर्शन घडविण्यासाठी मुलीने दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. बरीचशी भटकंती झाल्यावर आता फक्त वीकेन्डला फिरु बाकी आम्ही घरीच बसतो असा सल्ला मुलीला दिला आणि घरच्या घरी आराम सुरु झाला. वेळ घालविण्यासाठी मुलीने मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या, गाण्यांच्या व्हीसीडी तैनात ठेवल्या होत्या. त्याचा आनंद लुटणं सुरुच केलं. घरी कंटाळा आला की […]

घरटं छोटं

पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे…. […]

लेकीच्या अल्प मुक्कामाचा आनंद

पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी […]

स्वामी विवेकानंदांचा धर्मविषयक दृष्टीकोन

आयुष्यात आनंद मिळवायचा हा मूळ उद्देश सोडून देऊन तो आनंद कसा मिळवायचा यावरून जगामध्ये भांडणं आणि कट्टरता सुरू आहे. आपल्या धर्माकडे तटस्थ वृत्तीने बघून जे त्याज्य आहे ते टाकून देऊन जे उपयुक्त आहे जे आधुनिक सुधारीत जगामध्ये उपयुक्त आहे तेच स्वीकारायचे, हा विवेकानंदांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजानेही आत्मसात करावा, या मताचा मी आहे. […]

डबा

अस म्हणतात की शेवटच्या काळात माणसाला आपल्या चुकांची, पाप पुण्याची, आत्मपरीक्षण करण्याची इच्छा होते. आणि आज माझ्या बाबतीत असेच झाले आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू होणार असून त्यासाठी मुलांना गणवेश. इतर शालेय वस्तू आणण्यासाठी आईबाबांची लगबग सुरू होते. काल नातू वरद म्हणजे कान्हा माझा हा बाजारात जाऊन हे सगळे आणले. ते दाखवत असताना मी त्याला […]

1 115 116 117 118 119 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..