दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयातून रंगमंचावर साकारले जाणारे नाटक सर्वात आधी उमटते ते नाटककाराच्या मनात. कधी एखादी सामाजिक समस्या कधी कुठली राजकीय बातमी, कधी चक्क पुराणकथा, कधी मनात उमटणारे भावनांचे संदर्भहीन तरंग, कशामुळे नाटककाराच्या मनात नाटकाची ठिणगी पडेल सांगता येत नाही. पण ही ठिणगीच नंतर प्रेक्षकांच्या मनात विचारांची ज्वाला पेटवते. नाटक हे जसं करमणुकीचं साधन आहे, तसंच […]
कोरोना पित्यर्थ सतत बाहेर पडणारी माणसे आता घरात पडून आहेत. सप्ताहात एकदा घरी असले की कसे गोड वाटायचे.आता मात्र खिडकीवाटे डोकावले तरी , डोकावण्याचे सुख काय असते याचा अनुभव येतो. […]
आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार. […]
स्वारी च्या संभाषणातून इंग्लिश शब्दांचा अगदी भडीमार होत होता आधी त्याच्या मित्राचा फोन असावा बहुतेक यावर त्याने त्याच्या ऑफिस बद्दल बर्याच फुशारक्या मारल्या. […]
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. […]
आता तुझ्या वर आईचे संस्कार झालेले आहेत म्हणून त्याबद्दल जास्त सांगत नाही. फार तंग कपडे. हवामानाचा विचार करून. आवश्यक तेवढेच. वारेमाप खर्च करून आवडते म्हणून आणणे बरोबर नाही. हौस मौज करावी नक्कीच पण मर्यादित. सांगायला बरेच काही आहे म्हणून तुला जास्त सांगणार नाही. पैसा वाचवणे म्हणजे मिळवणे होय. खर तर मला हे सांगायला नको वाटते तरीही सांगावेसे वाटते की आयुष्यात तुमच्या भाषेत सांगायचं तर एन्जॉय म्हणून मूल उशिरा होऊ देणे हे अजिबात चुकीचे आहे. आधीच वय शिक्षण नोकरी लग्न हे सगळे वेळीच होत नाही त्यात हा विचार याचा काय परिणाम होतो याचा विचार करून निर्णय घ्यावा. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची […]
त्या सात वर्षांच्या काळात बरंच काही घडलं ,घडवून आणलं. त्याची संगीताच्या भाषेत ही Medley ! खरं तर यातील प्रत्येक अनुभवावर स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल पण- […]
हुकूमशाहीला किंवा एकाधिकारशाहीला समाजवाद समजलं गेल्यामुळे भारतात लोकशाही हा मोठ्ठा विनोद झाला.
माणसाच्या डे टु डे गोष्टींमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे, राजकारणी आणि प्रशासन हा लोकांच्या टीकेचा विषय झाला. निवडून येणे हा सर्वोच्च असण्याचा निकष झाला, शिक्षण अनुभव ज्ञान हे दुय्यम झाले. सत्ता एकवटली गेली, अभिव्यक्ती हरवली गेली. […]
संसारात पण घरच्या कर्त्या माणसाने अगदी घट्टपणा म्हणजेच खबींर मजबूत मनाचा असेल तरच वरच्या पाळी प्रमाणे आपल्या सर्वांच्या सुखासाठी. समाधानासाठी राबणारी मरमर करणारी उसंत न घेता न दमता भिंगरी प्रमाणे फिरणारी तिला साथ दिली तर सर्वांचे कल्याण. आणि नंतर पण निगुतीने पीठ एकत्रित करून भरावे लागते. सर्वांना बांधून ठेवले तरच. वेग. स्पर्धा. गरजेपेक्षा जास्त. योग्य वेळी योग्य निर्णय असे शिकवतात दळण. त्यामुळे कस दळाव हे कळायला हवे.नाही तर काय होईल ते तुम्ही ठरवा पीठा ऐवजी सगळेच अर्धवट. श्रम करताना दमणे आलेच अशा वेळी चिडचिड. त्रागा. दुसर्यांना दोषी ठरवणे हे मात्र होऊ नये म्हणून दळिता कांडिता तुज गायीन अनंता यासाठी ओवी.चांगले विचार. अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासाठी.. […]