नोकरी करत असताना वेळ नव्हता म्हणून असे करणे जमले नाही. आणि स्वभावही नव्हता. त्यामुळे आता भरपूर वेळ मिळाला आहे म्हणून अशा उठाठेव करते पण फक्त मनातून. दोन दिवसांपूर्वी आमच्या गॅलरीतील आमच्या वर वारा आणि उन्हाचा त्रास न होउ देणाऱ्या नारळाच्या दोन तीन फांद्या छाटल्या. त्यामुळे मला राग आला होता. पण काय करणार नाइलाज म्हणून गप्प बसले… […]
कलासरगम ही ठाण्यातील सांस्कृतिक नाट्यचळवळ घडवणारी हौशी नाट्यसंस्था. या संस्थेने आम्हाला काय दिलं? सांगू… ‘शून्यातून विश्व कसं उभं करायचं’ ते या संस्थेने शिकवलं. झिरो balance असताना गणेशोत्सवात १० x १० च्या स्टेजवर श्याम फडके, बबन प्रभू, वसंत सबनीस इत्यादी विनोदी लेखकांची तीन अंकी नाटके बसवून दहा दिवस ट्रेन, एसटीने किंवा टेम्पोने (boxset) प्रवास करून ठिकठिकाणी साखर […]
दहिसर पश्चिमेला आमचा मासळीबाजार. दहिसर पूर्वेकडून सबवे मधल्या चिंचोळ्या उंचवट्यावरून तिरपं चालत पश्चिमेला गेलं की लगेच मासळीबाजार लागतो. त्याला समांतर पंचवीस तीस पावलं चालल्यावर, दोन तीन फुलंवाल्या फुलांचे वाटे घेऊन बसतात. प्रत्येकीच्या डाव्या उजव्या बाजुला, घाऊक बाजारातून आणलेल्या फुलांची बोचकी असतात, आणि त्यातल्या फुलांचे वाटे समोर मांडलेले असतात. केशरी गोंडा, पिवळा गोंडा, लालसर लहान गोंडा, जास्वंद, […]
विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला […]
आता शाळेला सुट्टी लागली की मला. खूप बोअर होत. काय करणार अशी भुणभुण लावली होती नातवाने. अरे आम्ही अशा दिवसात खूप मज्जा करायचो. तू असे कर बुडबुडे कर. त्याला समजले नाही म्हणून तो म्हणाला की म्हणजे वॉटर बबल्स का. पण ते आता मिळत नाही. बाहेर गेल्यावर असेल तर विकत घ्यावे लागते. हो ना पण आम्ही घरीच […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते […]
तसा मी घरात बायकोला थोडीफार मदत ही करतच असतो. अहो, खरंच ! म्हणजे “वॉशिंग मशिन लावणे” तर तुम्ही वाचलच असेल. म्हणजे नसेल तर वाचा इतकंच यातून सांगायचंय. याशिवाय भाज्या , कांदे, बटाटे, टोमॅटो चिरून…आता चिरून म्हणजे अगदी विळीवर बसून वगैरे नाही हो, सुरीनेच देतो चिरून. भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत […]
विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण […]
असं म्हणतात की प्रत्येक मराठी माणसाला नाटकाची ओढ असतेच. एकदा तरी नाटकांत काम करावं ही सुप्त इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. खरं सांगा, तुम्हालाही कधी ना कधी असं वाटलं होतं की नाही? खरं म्हणजे नाटकवेडेपणा हा कांही फक्त गडक-यांवर (राम गणेश) प्रेम करणा-या मराठी माणसाचा किंवा शेक्सपियरवर प्रेम करणा-या इंग्रज माणसाचाच वारसा नाही. तो सर्व मानवजातीचा वारसा आहे. जगांतली कुठलीही भाषा बोलणा-याला आणि कोणतेही तत्त्वज्ञान मानणा-याला कोणत्या ना कोणत्या नाट्यप्रकारांत गोडी असतेच. […]
हे रेडिओ चे चित्र पाहिले आणि मन चार दशके मागे गेलं. शाळेची तयारी करून वडिलांच्या सायकल जवळ त्यांच्या निघण्याची वाट पाहत उभा असलेला मी आणि कानावर ऐकू येणाऱ्या या जाहिराती […]