सीमा एक शिक्षिका. शांत आणि समाधानी. एका कडक शिस्तीच्या मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील. कसलेही लाड नाहीत. आवडनिवड सांगायची नाहीत अशी कडक शब्दात तंबी दिली जायची. घरामध्ये सगळ्यांना कपडे आणणे हे चुलत्याचे वडील होते वयाने म्हणून. नवू वारी साड्यांचे जोड. झगे. परकर पोलक्या साठी दोन रंगाची छिटाचे तागे. मुलासाठी खाकी व दोन रंगाचे कापड. धोतर जोड असे एकदम […]
मार्केटला जाण्यासाठी मी घराबाहेर पडलो, खाली रस्त्यावर आलो आणि रिक्षाही पकडली. सहजच माझं लक्ष रिक्षा चालकाकडे गेलं. आणि मी चपापलोच! आमच्याच कॉलनीत राहणारे परब रिक्षा चालवत होते! “साहेब, नमस्कार,” परब आरशातून माझ्याकडे पहात उद्गारले. “नमस्कार, परब हे काय नवीन? ” मी विचारलं. “हो, हल्लीच हा एक नवीन उद्योग सुरु केला आहे.” “चांगलं आहे,” परबांच्या आवाजातल्या मजबूरीच्या […]
“आज धुणारायस का रे कपडे” ? बायकोने नेहमीप्रमाणे मला न आवडणारा प्रश्न विचारला. कपडे धुणारायस का ? कसं वाटतं ते ! म्हणजे मोरीत बसून मी धोका हातात घेऊन कपडे बडवतोय , असं चित्र डोळ्यासमोर येतं. मी अनेकदा तिला म्हट्लं “अगं वॉशिंग मशीन लावतोयस का ? असं विचार ना”. त्यावर ती लगेच “का ! त्यामुळे काय फरक […]
सहा महिन्यांनंतर बरेच प्रयोग, औषधे आणि व्यायामाचे प्रकार सातत्याने केल्यावर आता कोठे विजयचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणजे तो आता पायऱ्या सहज उतरू लागला होता. पायाच्या निमित्ताने विजयला सहा महिने सक्तीचा आराम करावा लागला होता तरीही या सहा महिन्यात त्याने त्याचा आर्थिक भार दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर पडू दिला नव्हता. त्याचा खर्च निघावा इतके छोटे मोठे […]
चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो. […]
‘कलासरगम’ नाट्यसंस्थेसाठी त्यांना राज्य नाट्यस्पर्धेत नाटक करायचं होतं. ठाणे नगर वाचन मंदिर येथे पी. सावळाराम आणि म. पां. भावे यांचा कार्यक्रम होणार होता. तो ऐकण्यासाठी मी जाणार असल्याचे विश्वासला समजलं. तो आणि विजय जोशी (दिग्दर्शक), जे आता सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, असे दोघं मिळून मला भेटायला म्हणून वाचन मंदिरात मागे हातात बाड घेऊन बसले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मला गाठलं आणि विचारलं, ‘तुमच्याशी बोलायचं होतं.’ […]
तर चाट, अर्थात भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इ. इ. इ.. अर्थात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा,. बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी. […]
विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी […]
मी १९५९-६१ दोन वर्षे युनिव्हर्सिटीच्या फोर्टमधल्या जुन्या इमारतीत एम.ए. च्या लेक्चर्सना जात असे.एम.ए. इकॉनॉमीक्सचे वर्ग फक्त तिथेच असत.त्या काळी डॉ. दातवाला, डॉ.हजारी, डॉ. मिस रणदिवे, डॉ.लकडावाला, डॉ.ब्रह्मानंद, डॉ.शहा, प्रोफेसर गायतोंडे, प्रोफेसर गंगाधर गाडगीळ, प्रोफेसर लाड अशी त्याकाळची नामांकित मंडळी अर्थशास्त्र विभागांत होती. […]
नेहमी चर्चा होत असतात की बाहेर सहलीला गेल्यानंतर आलेले भयानक अनुभव. आता या अनुभवांसाठी भुतंखेतं काहीतरी विचित्र घटना असलं पाहिजे असं काही नाही. भयानक अनुभव म्हणजे काय की जो तुमची झोप उडवून टाकतो. […]