तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. […]
पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं. […]
विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता. […]
आजवर मी केलेल्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त कालावधी मी इस्लामपूरच्या “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, साखराळे (CEPS) किंवा CEPR(राजारामनगर) मध्ये व्यतीत केलेला आहे. […]
कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू […]
मला नक्की काय हवंय किंवा काय मिळवायचय हे एकदा पक्कं झालं ना मग चिडचिड , तडतड होत नाही. घडलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून घेण्याची सवय जडली ना की उगीचच राग राग होतो. माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे , मी सांगतोय तेच बरोबर , किंवा मग , मला काही शिकवायचं नाही , मला सगळं समजतं , प्रत्येक गोष्टीत मला […]
भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या. […]
शिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व […]
इकडे टमरेल वाल्याला कळलं काय झालं तो एकदम हैराणच झाला. आधी तर तो सौमित्र ला शिव्या द्यायला लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिव्या देऊन काही उपयोग नाहीये. आणि अशा अवस्थेत त्याला सौमित्रच्या मागे पळता काय चालता पण येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा तशाच अवस्थेत तो आता बऱ्यापैकी वाहतूक सुरु झालेला रस्ता पार करावा लागला असता. […]
आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी […]