नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

पाइड किंगफिशर (कवड्या खंड्या)

“उडू नको रे बाबा. एकच फोटो काढू दे ” … मनातून विनवणी चालू होतीच. त्याने जाणले असावे. डौलदारपणे माझ्याकडे वळलेली नजर आणि माझी “क्लिक” … एकच गाठ पडली. .. Pied Kingfisher कॅमेरा मधे बंदिस्त करायची बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते. […]

माझे शिक्षक – भाग ४ (आठवणींची मिसळ १८)

माझ्या जन्माच्या सुमारास माझ्या वडिलांना स्थिर नोकरी नव्हती.वकिली न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १९३४मधे बेळगावला कोचिंग क्लासेस काढले.त्यांत खूप नुकसान झालं.क्लासेसना चांगले दिवस यायला अजून वेळ होता.त्यानंतर बेळगावचं घर विकून, कर्ज फेडून ते मुंबईस आले.वसईचे वाघ हायस्कूल, लालबाग-परळचे सरस्वती हायस्कूल, खारचे एक हायस्कूल अशा अनेक शाळांमधे त्यांना तात्पुरती नोकरी मिळत असे.पण कायमस्वरूपी कधीच मिळाली नाही. […]

उगाच काहीतरी – ११ (भारतीय शालेय वर्ष – एक (रिकामटेकडा) विचार)

भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते. […]

संधीचं सोनं

विधात्याने सृष्टी निर्माण करताना भर दिला तो विविधतेवर. जगात कोणत्याही दोन गोष्टी समान नसतात. माणसामाणसाचं रुप वेगळं असतं, राहणीमान वेगळं असतं. प्रत्येक प्राण्याची प्रवृत्ती वेगळी असते. वनस्पतींचे आकार वेगळे असतात, प्रकार वेगळे असतात. संपूर्ण जगात कोणत्याही दोन ठिकाणी कोणासाठीही समान अशी एखादी गोष्ट असते का? सृष्टीतील विविधतेने भारावून गेल्याने आपल्या मनात या प्रश्नाचं प्रथम नकारात्मक उत्तर […]

उखाणा नको त्याला बहाणा

उखाणा हो नुसते म्हटले तरी लाजायला. होते. हो ना. कुणी शोधले असेल हे. पण आज तागायत उखाणा घेणे आवश्यक आहे लग्न ठरले की घरातील व बाहेरील बायका मैत्रीणी उखाणे शिकवतात. आता हल्ली म्हणे उखाण्याचे पुस्तक मिळते. कोणता उखाणा कधी घ्यायचा हे असते त्यात. आणि यातून बरेच काही शिकायला मिळाले. इतिहास लिहिताना जसे अनेक साधने असतात त्यातून […]

सेवाव्रती

कर्माशी निष्ठा ठेऊन निर्मोही आचरण करत निवृत्त होणाऱ्या असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांचे परब जमादार हे एक प्रातिनिधिक उदाहरण. खिसा कसा कापला आहे हे पाहून कोणत्या ‘लाईन’ वरचा आरोपी आहे हे ओळखणारे , कडी कशी तोडली आहे हे पाहून आणि चोराने काय नेलं या पेक्षा काय सोडून गेला हे पाहून आरोपींचा नेमका अंदाज बांधणारे आणि काही तासात केस उघडकीला आणणारे unsung heroes या DCB CID ने पाहिले आहेत. […]

दोस्त, दोस्ती आणि बरच काही…

आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात. […]

धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने !

नुकताच मी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे “ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या डोक्यात विचारांचे कल्लोळ माजू लागले. दिघे साहेबांचे जे असंख्य चाहते होते त्यात मी सुद्धा होतो. फक्त चाहताच नव्हे तर मी त्यांचा अनेक दशके त्यांचा अनुयायी आणि सहकारी सुद्धा होतो. दिघे साहेब हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भविष्यात या विषयावर कुणीतरी डॉक्टरेट नक्की मिळवेल इतके त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड मोठे आणि गूढ होते या बद्दल माझ्या मनात शंका नाही . […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही…  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे. […]

1 122 123 124 125 126 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..