शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. […]
गंगा ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. सर्व पुराणात गंगेचे महात्म्य वर्णन आहे. स्कंदपुराणात——— तद्तत् परमं ब्रह्म द्रव रूप महेश्वरि । गंगारूपं यत् पुण्यतमं पृथिव्यामागतं शिवे ।। म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे. […]
गुरुकुल मध्ये गुरुगृही गेल्या वर शिक्षकांच्या हातात मुले सोपवून पालक निर्धास्त असत. तर गुरु म्हणजे आईवडील मग आत्ताच असे का व्हावे. असो कालाय तस्मै नमः तरीही आतून मनापासून वाटते की पालक. मुले व शाळा यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे. […]
सातवी पर्यंतच्या शिक्षणांत बरेच सहाध्यायी होते. अंधेरीमधे ही एकमेव शाळा होती. ज्या मुलांच्या आईवडीलांना ही शाळा पसंत नसे, त्यांच्या मुलांना ते पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयांत घालत. अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी होती.त्यामुळे मध्यम, उच्चमध्यम घरांतली सर्व मुलं इथेच प्रवेश घेत. मला आठवतयं की रत्नमाला या नटीचा मुलगा याच शाळेत होता.नीटनीटका वेष, तेल लावून व्यवस्थित भांग पाडलेले, चापून बसवलेले केस, ह्यामुळे तो उठून दिसायचा.पण स्वभावाने बुजरा असल्यामुळे मुलांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. […]
शहराबाहेर जाणार्यांपैकी स्कूटरवर मी पण एक. अचानक समोरून येणारी ट्रॅफिक एकदम बंद झाली. माझ्यासारखे इतर आणि त्याचबरोबर या बाजूला असलेले पोलीस दादा पण बुचकळ्यात पडलेले. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन यांनी लिहिलेला हा लेख माझा देश महान करण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या करता मला जनजागृती करायची आहे. सैन्यामधील ट्रेनिंग, कारवाया आणि जबाबदाऱ्या मी, इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, मध्ये जुलै १९७३ला रुजू झालो आणि १५ जून १९७५ रोजी “कमिशन्ड ऑफिसर” म्हणून पायदळातील ७-मराठा-लाईट-इन्फन्ट्रीत प्रवेश केला. जम्मू-आणि-काश्मीरच्या सीमावर्ती […]
२० एप्रिल २०१६. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रियांका, शर्वरी आणि केतकीला अनेक कामे करायची होती. मलाच कोणतेही काम नव्हते. अनेक विचार मनात येत होते. पण मी स्वतः ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कार्यक्रमापूर्वीचा रियाज केला. वय झाल्यामुळे माझी आई कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हती. तिचा आशीर्वाद घेऊन मी तीन तास अगोदरच गडकरी रंगायनतला पोहोचलो. कारण मला या […]
प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला. […]
पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला. […]
१३ डिसेंबर २०१५ रोजी नगर विकास मंचच्या ‘जल्लोश’ या मोठ्या इव्हेंटचे दीपप्रज्वलन माझ्या हस्ते करण्यात आले. या समारंभात आमदार संजय केळकर यांनी माझ्या एक हजाराव्या कार्यक्रमाची तारीखच जाहीर केली. मला ‘ठाणे नगर रत्न’ पुरस्कार जाहीर करून सुभाष काळे यांनी या वर्षाची उत्साही सुरुवात केली होती. सुभाषजींच्याच ‘जल्लोश’ या इव्हेंटने २०१५ या वर्षाची सांगता झाली. १ जानेवारी […]