नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो. […]

पूर्णागिरी

पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’ […]

अनोखी गाणी अनोखी भेट

एक दिवस एक व्यक्ती स्वर-मंचच्या ऑफिसमध्ये आली. त्यांचे नाव संजय पवार. रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खर्जामधील लक्षात राहण्यासारखा आवाज. एका निराळ्या कामासाठी ते भेटायला आले होते. पण समोर हार्मोनियम पाहून त्यांनी चक्क गाणे ऐकवण्याची विनंती केली. हा माणूस गझलचा निस्सीम चाहता होता. त्यांचे काम काही झाले नाही. पण आमची मैत्री झाली. लवकरच त्यांनी ‘प्रेशिया फार्मा’ नावाची स्वतःची […]

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती – भाग २ (आठवणींची मिसळ १३)

चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे. “स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात. […]

उगाच काहीतरी – ६

अननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो. […]

आणि ते हुकलंच

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये मुरलीधर नाले यांनी लिहिलेला हा लेख बेंबीत कस्तुरी बाळगणाऱ्या मृगाला त्याची जाणीव नसते. ते बेभान होऊन त्या वासाचा शोध घेत जंगलात धावत सुटते. मानवाचे देखील काही अंशी तसंच असतं. जीवनाचं ध्येय काय व ते साध्य करण्यासाठी त्या स्वप्नाचा धांडोळा शोधत मनुष्य आयुष्य कंठीत असतो. आयुष्याच्या संध्याकाळी स्वप्न कितपत साध्य करता […]

९०० पूर्ण झाले…

आयोजक आणि निवेदक अशोक शेवडे यांच्याबरोबर काही कार्यक्रम मी केले. ठाण्याच्या शिवसमर्थ मंदिर ट्रस्टसाठी गाण्याचा कार्यक्रम केला. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ‘भजन-संध्या’ सादर केली. आमचे चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत काब्राजी यांच्या वाढदिवसानिमित्त गझलचा मोठा कार्यक्रम ब्ल्यू रूफ क्लब येथे गायलो. दरवर्षीप्रमाणे संत एकनाथ मंदिर, भिवंडी येथेही संत एकनाथ षष्ठी निमित्त गाण्याचा कार्यक्रम सादर केला. […]

कॅज्यूअल्टी

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, ” ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, ” महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० […]

रूद्रनाथ आणि कल्पेश्वर

‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ […]

1 127 128 129 130 131 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..