‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ […]
हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया. […]
भिवंडी, चेंबूर, सातारा, बडोदे येथे काही कार्यक्रम करून आयोजक दिनेश केळकर यांच्या रोटरी क्लबसाठी मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर केला. ‘आनंद भारती’ या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त ‘शंभर संगीतकारांची शंभर गाणी’ असा अभिनव कार्यक्रम आखण्यात आला. संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार होता. सलग आठ तास होणाऱ्या या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार होती. अनेक […]
विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी […]
१९३० साली मणिबेन आपल्या वडिलांच्या बरोबर काम करू लागल्या. सरदार पटेलांचे सगळे वेळापत्रक त्याच बघत. त्यांच्या कामाच्या, विचारांच्या नोंदी ठेऊ लागल्या. १९४५ साली कारागृहातून परतल्यावर सुद्धा त्या आपल्या वडिलांबरोबर काम करत राहिल्या. १९५० साली सरदार पटेल ह्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मणिबेन ह्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. १९७६ सालच्या ‘इमर्जन्सी’ मध्ये त्यांना परत एकदा कारावास भोगावा लागला. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेला हा लेख ‘मनसा चिंतितम् एकं दैवं अन्यत्र चिंतयेत’ असं संस्कृतात एक वचन आहे. आपल्या मायमराठीत एक कवन आहे, त्या कवनात स्वच्छ अशी शाहिरी भाषा आहे. ‘मनात येती हत्ती घोडे, पालखीत बैसावे, । देवाजीच्या मनात आले, पायी चालवावे ।। मर्जी देवाची… एकूण देवाची मर्जी म्हणून निःश्वास […]
खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं. […]
स्वर – मंच ॲकॅडमीपासून इतके दिवस कधी दूर राहिलो नव्हतो. पुन्हा एकदा सर्व पूर्ववत सुरू केले आणि मग कार्यक्रमांना सुरुवात केली. ‘नज़राना गीत – गज़लोंका’ हा नवीन कार्यक्रम आयोजक मोहन पवार यांच्यासाठी केला. अजून काही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राबाहेर गेलो. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मराठी अभिमान गीत प्रकाशन सोहळा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये संपन्न झाला. यावेळी आम्ही मराठी […]
विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही […]
“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. […]