ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त गाण्याचा कार्यक्रम मी सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीतकार चिनार खारकर भेटायला आला. गेल्या वर्षीच्या चित्रपट ‘मानसन्मान’ नंतर आम्ही एकत्र काम केले नव्हते. “सर आपण नव्या पद्धतीच्या हिंदी गाण्यांचा अल्बम करू या. यात गझल नसतील. तुमच्या नेहमीच्या स्टाईलहून अगदी वेगळ्या रचना असतील.” चिनार म्हणाला. प्रियांकाही ॲकॅडमीत […]
चार महिन्यानंतर आता कोठे विजयला त्याच्या पायाला नक्की काय झाले आहे याचा अंदाज बांधता येऊ लागला होता. चार महिने विजयला पायऱ्या उतरता येत नव्हत्या ! चढता येत होत्या पण वेदना सहन करत ! विजयने काही दिवसापूर्वी त्याच्या आयुष्यातील पहिला एक्सरे काढून घेतला होता. पायाच्या टाचेतील हाड म्हणजे कॅलकॅनिअल स्फुर वरच्या बाजूला जरा वाढलेले दिसले. अँकलमध्ये सूज […]
मध्यंतरी आपल्या गृपवर डॉ. हरि नरके यांचे सह्या जमवण्याच्या त्यांच्या छंदात आलेल्या अनुभवाबाबत एक पत्र पोस्ट केले होते. त्यांच्या छंदाच त्यानी छान वर्णन झालं होतं. ज्या ज्या कार्यक्रमाला ते हजर रहात त्या त्या कार्यक्रमांतील मंचावर असणा-या सर्व मान्यवरांच्या सह्या ते घेत असत. त्या सर्वाची तपशीलवार नोंद ते ठेवत. त्यानी खूप श्रमांनी हा छंद जोपासल्याचे जाणवले. असे छंद मनापासून केल्याशिवाय जोपासणे कठीण असते. त्यासाठी चिकाटी, वेळ आणि थोडा फार पैसाही खर्च करावा लागतोच. त्यांनी पत्र लिहिलं होतं ते त्यांना आलेल्या कटु अनुभवासंबंधी. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने सही घेण्यासाठी भरपूर मोठी रक्कम मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. सर्वानीच त्या कलाकाराचा धिक्कार केला. ते सर्व वाचताना माझ्या कांही छंदाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. मग त्याही तुम्हाला सांगाव्यात असे वाटले. […]
आमच्या ओळखीचे एक मावशी आणि काका आहेत. दोघं ही रिटायर्ड शिक्षक. दोघंही उत्तम तब्येत राखून आहेत. मुलं माझ्याच वयाच्या आसपास. मोठा उमेश नोर्वे ला स्थायिक आहे आणि धाकटा राजेश हैदराबादला असतो. मुलं आमची लहानपणापासून मित्र. मावशी फेसबुक आणि व्हॉटसअप वर फुल्टू ॲक्टिव. काका आपलं काहीतरी थातुर मातुर टाकत असतात जास्त करून या ना त्या पोस्टवर कॉमेंट […]
दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख माझा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच होता. प्राथमिक शिक्षण जन्मगावी वाघोड ता. रावेर (जळगाव) या माझ्या जन्मभूमीतच घेतलं. माध्यमिक शिक्षणही दहावीपर्यंत गावातच झालं. अकरावी (मॅट्रीक) साठी रावेर या तालुक्याच्या गावी माझे मामा गुरुवर्य ना.भि. वानखेडे यांच्या घरी राहिलो. तेव्हा मला खरी शिक्षणाची गोडी […]
२००९ वर्षाची सुरुवात ‘गानहिरा’ या सुगम संगीत स्पर्धेच्या परीक्षणाने झाली. दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. परीक्षक म्हणून माझ्याबरोबर संगीतकार कौशल इनामदार होता. ‘अरे, तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे आहे. स्पर्धेनंतर जेवायलाच जाऊ या.’ कौशल म्हणाला. ‘मराठी अस्मिता’साठी कौशल ‘मराठी अभिमान गीत’ रेकॉर्ड करणार होता. ख्यातनाम कवी सुरेश भट यांचे शब्द होते […]
कंटोळी हा प्रकारच एवढा आकर्षक आहे की ती भाजी बघता क्षणी लक्ष वेधून घेते. डार्क किंवा लाईट पोपटी आणि हिरवा रंग. पातळ आणि लांब सडक देठ, एखाद्या खात्या पित्या घरच्या व्यक्तीच्या सुटलेल्या पोटासारखा गोल गरगरीत आकार आणि त्यावर असणारे संपूर्ण मऊ टोकदार काटे. […]
एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने […]
हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभुती आहे. भारताची सस्यशामल भूमी समृद्ध करणाऱ्या पवित्र नद्यांचा हिमालयात उगम झाला आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे. अशा शंकरानी आपल्या कायम वास्तव्यासाठी हिमालयाची निवड केली. पुराणांनी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. अनेक देव-देवतांचे क्रीडास्थान, निवासस्थान म्हणून हिमालय पुराण प्रसिद्ध आहे. कालिदासाने आपल्या […]