“आपला गालिचा फारचं खराब झालाय. जेव्हां जेव्हां एखादा पाहुणा येतो, तेव्हां मला या गालिचाची लाज वाटते.” सौ. मालिनी घाडगे म्हणाल्या. आपल्या बायकोला नेहमी खूष पाहू इच्छिणारे, तिच्याशी जमवून घेणारे श्रीयुत घाडगे गालिचाकडे पहात म्हणाले, “नव्या गालिचाची किंमत साधारण …..” त्यांच वाक्य पत्नीने पूर्ण करावं अशी अपेक्षा करत ते थांबले. सौ. घाडगेनी ते वाक्य पूर्ण केलं, “फक्त […]
१५० वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तोडायचे होते, सोपं नक्कीच नव्हतं. लोकांची मानसिकता बदलायची होती, सोपं नक्कीच नव्हतं. आपण पारतंत्र्यात आहोत हे जन-मानसात रुजवायच होतं, सोपं मुळीच नव्हतं. एखाद्या शत्रूची आधी तो आपला शत्रू आहे म्हणून जाणीव करून देणे गरजेचे आणि मग त्याच्याविरुद्ध लढा. काम कठीण होतं, पण आपण भारतीय आहोत, मुळातच चिवट असतो, तेच आपल्या आधीच्या पिढीने केले, वेग-वेगळ्या पद्धतीने जन-जागरण. सरला देवी चौधरानींनी गाण्याच्या माध्यमातून, साहिताच्या माध्यमातून देशातील काना कोपरयात स्वातंत्र्य संग्राम पोचवला. […]
अण्णाभाऊ साठे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे साहित्य आज अमर आहे. साहित्यिक कधी मरत नसतो तो पुस्तक रूपाने अमर असतो. पाच वर्षांनी मंत्री संत्री बदलतील पण साहित्यिकाचे पुस्तक अथवा नाव बदलत नाही. साहित्यिकाचे नाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहते वाचन संस्कृती जपत असताना. भरपूर साहित्यिकांची पुस्तके वाचाव यास मिळाली त्यापैकी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, प्राध्यापक […]
२००८ या वर्षाची सुरवातच कार्यक्रमाने झाली. १ जानेवारी २००८ रोजी कस्तुरी कॉलेज, शिक्रापूर येथे कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता विघ्नेश जोशी याने केले. पुढील कार्यक्रम इंडियन ऑईल अँड नॅचरल गॅस कॉन्फरन्समध्ये झाला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री उपस्थित होते. एप्रिलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेत ठाण्यातील कलाकारांचा कलाकार रथ समाविष्ट करण्यात आला. […]
विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता… इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले… ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले,” माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची […]
आता मी जे दोन प्रसंग सांगणार आहे ते कदाचित पूर्वी कुठेतरी मी थोडक्यात लिहिलेही असतील.त्यातला पहिला प्रसंग माझ्यासाठी इतका गंभीरनव्हता पण मजेदार होता. तर दुसरा फारच गंभीर प्रसंग होता आणि त्याची परिणती वेगळी झाली असती तर मला ते प्रकरण महाग पडलं असतं. […]
हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते. […]
१९३२ साली असहकार आंदोलन,सविनय कायदा भंग ह्या सगळ्यात त्यांनी भरपूर काम केले. एक मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यात कुट्टी मालू ह्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व देखील केले त्यावेळी त्यांची मुलगी केवळ दोन महिन्यांची होती. इंग्रजांचे दडपशाही चे धोरण सर्वश्रुत आहेच. त्यांनी महिला, मुलं, अबाल-वृद्ध काहीच बघितले नाही आणि सगळ्यांना देशद्रोही म्हणून कारावासात टाकणे सुरू केले. कुट्टी मालू ह्यांना सुद्धा २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली, त्यांच्या दोन महिन्यांच्या तान्हुली बरोबर त्यांनी कारावास भोगला. प्रत्येक चळवळ जी भारताला स्वातंत्र्य देऊ शकेल अश्या सगळ्यात कुट्टी मालू ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, मग ते सविनय कायदे भंग, असहकार आंदोलन किव्हा चले जाव चळवळ. प्रत्येकवेळी त्याची शिक्षा ही ठरलेली, कारावास कालावधी फक्त वेगळा होता. कारावसातून सुटून आल्यावर त्या अजून जोमाने कामाला लागायच्या. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. ‘देवाची […]
श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….। […]