नक्षत्रांचे देणे नंतर कार्यक्रम आयोजकांना हे एकदम पटले की फक्त हिंदी मी चांगला गाऊ शकतो. मग मराठी भावगीते, हिंदी चित्रपटगीते यांचे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. “हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रमात तुला गाताना पाहून खूप आनंद होतो.” माझे गुरू श्रीकांत ठाकरे म्हणाले, “तू एक हजार कार्यक्रमांचे स्वप्न पहातो आहेस हे […]
तो गोरक्षनाथांना भेटला असता ते त्याला राज्याचा त्याग करून सन्यास घ्यायाला सांगतात! पण राजा म्हणतो मी तसं करू शकत नाही कारण माझ्या राणीचे माझ्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकून गोरक्षनाथ त्याला एक फळ देतात आणि सांगतात हे फळ खाल्ल्यावर तू अमर होशील! राजा ते फळ घेऊन राजवाड्यात जातो आणि विचार करतो, जर हे फळ मी खाल्ले […]
ही एक लोककथा आहे. तिन्ही लोकांत असुरांचे प्राबल्य वाढले होते. देव, देवता, ऋषीमुनी, लोक असुरांच्या त्रासाने त्रस्त झाले. शिव संहारक आहे. सर्वांनी जाणले की शिव व शक्ती एकरूप झाल्याशिवाय असुरांचे निर्दालन होणार नाही. सर्वजण शंकराला शरण गेले. आपली व्यथा त्यांनी शंकराला सांगितली. शिव व शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता पण शंकराला पटवून दिली. शंकरालासुद्धा तो विचार पटला. […]
गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती. मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ? आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ? सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला […]
बायडाला आणि बाबुला एकत्र पहिल्या नंतर त्या रात्री जेव्हा दादा घरी आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या बाबू ची चौकशी सुरु केली , त्यांना तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला गेला हे समजल्यावर ते तसेच उठून त्याच्या कडे गेले . बाबू ला झोप लागतच होती कि त्यांना शेजारी कोणीतरी येऊन बसलय अशी चाहूल लागली आणि सोबत दारू चा […]
कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच ‘प्रभू-मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच […]
“काका आपल्या खाद्य विशेषांकाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. अजूनही तुम्ही त्या मॅडम बुदिमाला रॅगदे यांची मुलाखत घेतली नाही? कधी घेणार आहात?’ सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख मुलाखत विशारद काका सरधोपट यांना विचारीत होते.” “साहेब, त्या अमेरिकेला गेल्या आहेत. उद्या येतील. मी उद्याचीच वेळ घेतली आहे. उद्या मुलाखत […]
मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर […]
वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. मोहिनी वर्दे यांनी लिहिलेला हा लेख रस्त्यावर पडलेला रूमाल त्या दिवशी मी सहज उचलला चार बाजूंनी लेस विणलेली कोपऱ्यात दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून;… एक आवंढा गिळला. कुठे गेले ते दिवस? तो रोमान्स? स्वप्नांच्या थरकत्या पुलावरुन पैलतीर गाठण्याचा दिवस कोणाकोणाच्या आयुष्यात येतो? त्यांच्या? माझ्या? तसं पाहिलं तर जीवनात […]