नरेनची पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा उत्साह. नरेनने ट्रेनिंगमधेही उत्साहाने रस घेतला आणि ट्रेनिंग दरम्यान होणा-या इतर कार्यक्रमांत सुध्दा. कोणताही बेत करा हा पुढे असायचा. क्लासमधे अगदी पहिल्या बाकावर नरेन बसायचा. मी मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसायचो. दादा साळवी, शरद लिखिते आणि मी. तिघे तिथे बसत असूं. नरेन प्रत्येक लेक्चरमध्ये इंटरेस्ट घेत असे. तर आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरच्या फॕकल्टीला मान देत असू. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये पं. यशवंत देव यांनी लिहिलेला हा लेख माझ्या आयुष्याचा लेखाजोखा काय मांडायचा? पेण सारख्या गावात जन्मलो, संगीताचं बाळकडू मिळालेला नानू वडिलांच्या सतार, तबला, पखवाज, बाजाची पेटी, — पेटी, बॅटरीवर चालणारा कर्ण्याचा रेडिओ कुत्र्याचं चित्र असलेली ग्रामोफोन शिवाय किल्ली दिली की आपोआप बराच वेळ वाजणारी, तंतुवाद्यासारख्या किणकिणणाऱ्या आवाजाची पितळेच्या सिलेंडरवर लोखंडी […]
लग्नाचं विचारून आपण खूप मोठी चूक केली अस बाबूला वाटू लागला , त्याला पुन्हा बायडा च्या सामोर जायची पण हिम्मत होईना . पण बायडा जेव्हा केव्हा त्याच्या समोर येई ती मात्र त्याच्या कडे एकटक रोखून पाही. अशोक ने पुन्हा बाबुला बायडाच्या बाबतीत काही विचारल नाही, बाबू चा चेहरा बघून अशोक ला देखील खूप वाईट वाटत असे […]
ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या […]
आज जगात राजकारणी, विचारवंत, अभ्यासक, बुवा, बाबा, बापू आणि महाराज त्यासोबत लेखक कवी आणि पत्रकार. विचार तर खूप मांडतात पण प्रत्यक्ष जीवनात तेच त्याच्या विचारांची होळी करताना दिसतात. त्याला हातावर मोजण्याइतके अपवाद असतात. पण जे अपवाद असतात त्यांच्याच वाट्याला खडतर आयुष्य येते. लहानपणापासून शाळेच्या फळ्यावर रोज लिहिला जाणार सुविचार “नेहमी खरें बोलावे!” तो सुविचार वर्षानुवर्षे लिहिणारे […]
बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी […]
“बाबा, ओ बाबा, दया करा. जरा ह्या गरीब, भुकेलेल्या भिकाऱ्याकडे पहा. साहेब, तीन दिवसांचा उपाशी आहे, साहेब. ह्या थंडीत रात्री कुठे आसरा घ्यायचा तरी पांच रूपये द्यावे लागतात. मी शपथ घेऊन सांगतो, साहेब मी एका गांवात शिक्षक होतो पण दुसऱ्या मास्तरांनी हिशोबात गडबड केली आणि माझी नोकरी गेली. खोट्या साक्षीदारांनी मला बळीचा बकरा केला साहेब. एक […]
आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. […]
आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती, सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला, “बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल. “वाकड ला गेलो होतो” बाबू ने कूस […]
माझ्या वडिलांचे क्लबमधील मित्र चंद्रशेखर टिळक हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी ‘रसधारा’ हा गाजलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी मला बोलावले. चंद्रशेखरजींशी अनेक वर्षे आमचे घरगुती संबंध होते. मी लगेचच होकार दिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पहिला कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आम्ही केले. अनघा पेंडसे, प्रल्हाद अडफळकर, संध्या खांबेटे आणि […]