कोकणी माणूस दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल, कौले सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून लाल झालेली असतात. […]
वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये भारतकुमार राऊत यांनी लिहिलेला हा लेख अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे ‘गिव्हिंग’ हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी वाचण्यात आले. आयुष्यात एक टप्पा असा येतो, जेव्हा काही घेण्यापेक्षा काय देता येईल, याचा विचार मनात डोकावू लागतो. हा कालखंड महत्त्वाचा तर खराच पण तो अनेकदा मेंदूला मुंग्या आणणाराही असतो. आतापर्यंत आपण समाज, […]
बस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , […]
१ ऑक्टोबर २००२ रोजी ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मला मिळाला. अध्यक्षस्थानी ठाण्याचे महापौर रमेश वैती, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येतो. विख्यात व्हायोलिन वादक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एन्. राजम या संगीताच्या क्षेत्रातील माझ्याबरोबरच्या मानकरी होत्या. हा पुरस्कार आणि पेढे घेऊन मी लगेचच माझे […]
ज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल? […]
प्रवेशद्वाराजवळ परदेशी जायला निघालेल्या प्रवाशांची आप्तेष्ट मंडळी ताटकळत उभी होती. आपला जीवलग परदेशी निघाला, आता त्याचं सहा महिने, वर्षभर किंवा कदाचित त्याहूनही अधिक काळ दर्शनही होणार नाही या विचारांनी उमललेली व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. […]
अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो. “अरे ये गयबान्या, काय बोल्ला तू , बाबूच काय “अनिल आता जवळ जवळ अशोक च्या अंगावर येऊ लागतो. “काय बाबू च , बाबूच काय नाय, कोण बोल्ल बाबू, तो तर , […]
या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे […]
हे मूळ मंदीर कोणी व कधी बांधले याचे उल्लेख सापडत नाहीत. पण मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदीर २५०० वर्षांचे पुरातन आहे असा एक अंदाज निघतो. शंकराचार्यांनी या मंदिराचा बद्रीनाथाची मूर्ती स्थापन केल्यावर जीर्णोद्धार केला असावा. आजचे हे मंदीर कत्युरी राजाने बांधले व तिथे पूजा-अर्चा सुरू केली. त्यासाठी मंदिराला त्यांनी काही जमिनी इनाम दिल्या, असे काही संशोधकांचे […]