नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]

मार्क ट्वेनची चरित्र कथा

त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे. […]

शिवकाल भूषण

भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ काय खोटं आहे यात? शिवछत्रपतींना जर स्वातंत्र्याचा, स्वराज्य स्थापनेचा उत्कट, […]

उजेडाची पहाट येवो !

अगदी वेदमंत्रासारखी ऋचा वाटतेय ना? अर्थात शब्दांना अद्याप मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झालेले नाही,याची जाणीव आहे. पण गेल्या १०-१२ दिवसांच्या कुंद सकाळच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उजेड दिसला (रविवार सकाळ म्हणून की काय?) […]

जिंगल्स आणि बरेच काही

गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. […]

कावळे (कथा) – भाग 3

ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता. आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. […]

एक परीस स्पर्श… ( भाग -२९ )

तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या  दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा  उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या  जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो… […]

बाबल्याची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ १)

अलिकडे धाकट्या बहिणीकडे कोकणात गेलो असताना, ती मला म्हणाली,”कुणास ठाऊक ! पण मला वाटते की आपल्या आईने बाबल्याला आपल्याकडे ठेऊन घेतलं असतं तर कदाचित् तो असा ठार वेडा झालाही नसता.” “माझ्या मनात हा विचार कधी आला नव्हता” असं म्हणून मी तो विषय तिथेच संपवला.पण बाबल्याचा विचार असा मनातून संपला नाही.बाबल्याचा विषय हा न संपणारा विषय आहे.न सुटणारे कोडे आहे.हे सर्व असं कां झालं? घडलं त्यापेक्षा वेगळं कांही घडणं शक्य होत कां? ठळकपणे दिसणाऱ्या, सर्वाना ठाऊक असणाऱ्या बाबल्यासंबंधीतल्या घटनांशिवाय आणि कांही घडलं होतं कां ?ते काय असू शकेल ? हे प्रश्न बाबल्याच्या संबंधात त्याला ओळखणाऱ्या सगळ्याच संवेदनशील व्यक्तीना पडले असतील.मला तरी ते अजूनही मनात येतात. […]

स्वप्नांची दुनिया अधुरी

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये एकनाथराव खडसे यांनी लिहिलेला हा लेख जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी यागावी गणेशचतुर्थीच्या दिवशी मी जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शिक्षण औरंगाबादला घेण्यासाठी जावे लागले. कारण त्याठिकाणी माझे दोघे भाऊ कॉलेजमध्ये शिकत होते. एक मेडिकलला होता तर दुसरा एम.एससी करत होता. मी मात्र कॉमर्स शाखेकडे वळलो. अकोला […]

अनामिक

सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे. […]

1 142 143 144 145 146 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..