निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे. […]
रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी कुणी करावी? […]
कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या […]
अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही. […]
ही आहे माझ्या परीकथेतील माझी मोठी मुलगी. मला ही पहिली मुलगी झाली होती. आणि नांव काय ठेवायचं असा विचार करत होते. आणि मला वाटलं की माझ डॉ व्हायच स्वप्न माझी लेक पूर्ण करेल म्हणून मी तिच्या नावाचा विचार करताना डॉ हे आधी शोभेल असे काही तरी ठेवावे. आणि डॉ अनुराधा खूपच छान वाटलं म्हणून तेच ठेवले… […]
बाय द वे – शाहरुखचा येथे दुसऱ्यांदा पराभव झालेला दिसला – माधवन कडून ! पहिल्यांदा तो हरला होता “बिल्लू “मधील इरफान खान कडून ! अर्थात हे दोन्ही पराभव त्याच्यासाठी “मिरविण्यासारखे “खचित आहेत. एक पुसटती जखम त्याला “रईस “मध्ये नक्कीच झाली होती -नवाजुद्दीन सिद्दीकी कडून ! […]
एव्हाना मी दोनशे कार्यक्रमाच्या जवळ पोहोचलो होतो. दोनशेव्या जाहीर पोस्ट केली. मुक्काम कार्यक्रमाची आखणी आम्ही जोरात सुरू एक हजारच्या वाटेवरचा पुढचा मैलाचा दगड जवळ आला होता. या प्रोजेक्टची आखणी करीत असतानाचे भाऊंचे शब्द आठवले. ‘या हजार कार्यक्रमांसाठी बराच मोठा कालावधी लागेल. आज तुझ्याबरोबर आहेत ती माणसे कदाचित एवढा काळ असणार नाहीत.’ आज दोनशेव्या कार्यक्रमाच्या आखणीच्या वेळीच […]
कर्णप्रयागपासून ६५ कि.मी. अंतरावर बद्रीनाथाच्या वाटेवर हेलंग ही वस्ती आहे. हेलंगपासून पाच-सहा कि.मी. अंतरावर खनोल्टीचट्टी म्हणून वस्ती आहे. या ठिकाणी वृद्धबद्रीचे मंदिर आहे. गौतम ऋषींनी येथे तपोसाधना केली होती. त्यांच्या वृद्धापकाळात बद्रिनाथाने त्यांना या ठिकाणी दर्शन दिले होते. म्हणून स्थळ वृद्धबद्री म्हणून ओळखले जाते. या स्थानाला ‘अनीमठ’ असेही म्हणतात. वृद्धबद्रीचे मंदिर अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकाम […]
बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं. तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते. तिथेच त्यांची दोस्ती झाली होती. त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे. मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर. तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे. तिघे बाईकवरून फिरत असत. बाळू आणि […]
‘आई गं! खूप त्रास होतोय गं मला चालताना. घेऊन दे ना मला नवीन चप्पल. वाटल्यास मला दोन दिवस जेवायला देऊ नको. मी उपाशीपोटीच तुझ्यासोबत कामाला येईल. बघ ना माझ्या पायाकडे, त्या भेगांमधून किती रक्त येतंय?’ भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला […]