नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

भुरा….

‘धडधड धडधड कर्र…कच…कच…!’ कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि […]

संसार

“मलयगिरीचा चंदन गंधीत, धूप तुला दाविला…. स्वीकारावी पुजा आता, उठी उठी गोपाळा…!” कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की […]

जगातील जुनी योगशाळा – सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट

सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. […]

OK – वय वर्षे १७५

हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला . […]

उपहारगृह, टपरी, आजवर हादडलेली

आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं. […]

गॅदरींग….

कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच […]

भरारी

एक राजा हौसेने दोन गरुड आणतो. त्याला त्या गरुडांची आकाशातली भव्य भरारी पहायची असते. एका गरुडाला हातावर घेऊन तो आकाशाकडे उडवतो. क्षणार्धात तो गरुड आकाशात झेप घेतो. राजा अगदी हरखून जातो. दुसऱ्या गरुडालाही तसेच झेप घेण्यासाठी तो हातावर घेतो. मात्र हा गरुड न उड़ता झाडाच्या एका फांदीवर जाऊन बसतो. राजा हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. गरुड काही केल्या उडत नाही. […]

अशीही नोकरी

एका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते. […]

संवाद

बुध्दीला चालना देणाऱ्या प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम चालू होता. प्रशिक्षक तिथे जमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वेगवेगळे नुस्खे समजावून सांगत होता. संवाद कसा महत्वाचा आहे हे पटवून देत होता. […]

स्वत:चा आदर्श

एडी जरी अशा गुन्हेगारीच्या साम्राज्याबरोबर गुंतलेला असतो तरी तो त्याच्या मुलाला चांगली मूल्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. चांगले काय, वाईट काय हे शिकवायचा प्रयत्न करत असतो. अर्थात तो आपल्या मुलासमोर स्वतःचे चांगले नाव अथवा आदर्श ठेवू शकत नसतो. त्याचे शल्य त्याला सतत बोचत असते. […]

1 13 14 15 16 17 516
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..