कॅसेटचे प्रमुख वितरक ग्रँटरोडला होते. त्यांच्याकडे मी कॅसेट घेऊन गेलो. माझ्या कॅसेटची प्रत्येक बाब त्यांना नापसंत होती. माझ्यासारखा कॅसेट मार्केटला तसा अनोळखी, नवीन गायक, एकदम नवीन कंपनी, कॅसेटची अपुरी जाहिरात अशी अनेक कारणे देऊन त्यांनी नकार घंटा वाजवली. एव्हाना नकार ऐकण्याची मला सवय झाली होती. कॅसेटची भरपूर जाहिरात करण्याचे आश्वासन मी त्यांना दिले. पण त्यांनी स्वर-मंचतर्फे […]
पेडर रोडवरची आकाशगंगा ही वीस मजली आलिशान इमारत. त्यात तेराव्या मजल्यावर फ्लॅट नंबर तेरामध्ये ‘मिळून साऱ्या सया’ या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या भारतीय महिला संघटनेच्या कार्याध्यक्ष सौ. चारू चिटे राहतात. ‘चाची’ या टोपणनावाने त्या स्त्रियांच्या समस्या, प्रश्न, आंदोलने यावर लेख, कथा, पुस्तके, प्रबंध (विशेषकरून इंग्रजी दैनिके, साप्ताहिके, मासिके) लिहितात. मराठीतील अग्रगण्य दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजी रवीसांडे, […]
अमरावतीला एक तरूण व्यापारी रहात होता. त्याची दोन दुकाने होती व स्वतःचे घर होते. त्याचं नाव होतं दिनकर शेट्ये. तो कुरळ्या केसांचा, मोहक चेहऱ्याचा, सुदृढ, तरतरीत तरूण होता. तो नेहमी आनंदी असे. त्याला गाणेही आवडत असे. तो जेव्हा विशीत होता, तेव्हां तो मद्याच्या आहारी जात असे पण लौकरच विवाह केल्यावर त्याने नेहमी मद्य घेणे वर्ज्य केले. […]
बाहेरच्या जगात मराठीदिन कसा साजरा झाला हे मला माहित नाही पण माझ्या घरात तो खऱ्या अर्थाने साजरा झाला आहे त्यातून खात्री आहे की लवकरच पुढील पिढी माय मराठीला नक्कीच विसरणार नाहीत. इंग्रजी शिकणे गरजेचे आहे म्हणून मातृभाषा विसरुन चालणार नाही. […]
खरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या. […]
मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय. […]
एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. ‘ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,’ या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. कॅसेटच्या खर्चाचा अंदाज घेतला. तीस ते चाळीस हजार रुपये अपेक्षित खर्च होता. भाऊंनी कर्जाऊ पैसे देण्याचे मान्य केले. हे […]
‘लग्नाची बेडी’ या नाटकातील पद्मा चव्हाण यांची ‘रश्मी’ ज्यांनी पाहिली ते खरंच भाग्यवान!! ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..’ या काव्यपंक्तीनुसार त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांचा ‘कलिजा’ शब्दशः खलास होत असे.. म्हणूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राची ‘मर्लीन मन्रो’ व ‘सौंदर्याचा ॲटमबाॅम्ब’ ही उपाधी दिली होती.. […]
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. “कचराऽऽ” ती केकाटली. इथे मी हैराण. […]
शीर्षक: Beyond Horizon.. (क्षितिजापलीकडले) प्रकरण दुसरे समीर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना आठवत घरी निघाला.. काय घडले होते काही महिन्यांपूर्वी??? काही महिन्यांपूर्वी…… प्राध्यापक वसिष्ठ आपल्या बी. एस्.सी. – ऍस्ट्रो फिजिक्सच्या वर्गात बिग बँग थियरी शिकवत होते. लहानपणापासून प्राध्यापक खूप हुशार! खगोल शास्त्राची खूप आवड. सुट्ट्यांमध्ये जमेल तसे रात्री आकाश न्याहाळणे हा त्यांचा आवडता छंद! कुठल्या तरी विज्ञान […]