या सर्व प्रकारच्या तयारीनंतर कार्यक्रम करण्यासाठी मी अगदी अधीर या झालो होतो. पण भाऊंनी एक वेगळीच कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यांचे म्हणणे होते की माझा स्वतःचा कार्यक्रम आयोजित करण्याअगोदर मी वेगळ्या कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि केवळ आयोजनाचा अनुभव घ्यावा. कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी किती मोठी असते, याची मला थोडी देखील कल्पना नव्हती. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या बॅनरचीही […]
खंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे. मी एक […]
एखाद दिवशी संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की मी शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसतो. तिथे माझ्याचसारखी संध्याकाळचा मोकळा वेळ घालविण्यासाठी अनेक मंडळी जमलेली असतात. कुणी कट्टयावर गप्पा छाटत बसलेले असतात, कुणी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यात दंग असतात, तर कुणी शेंगदाणे, भेळ वगैरे टाईमपास खाण्याचा आस्वाद घेत असतात. हा सर्व माहौल निरखीत कट्टयावर शांत बसून राहणं हा […]
माझे लहानपण तालुका, पण खेडेवजा ठिकाणी गेले. गावात नगरपालिकेच्या पहिले ते सातवी मराठी शाळा. तो काळ साधारण १९५५-५६ चा होता. पावसाळ्यात शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. […]
वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या. […]
फायनल परीक्षेच्या वेळेपासूनच व्ही.जे.टी.आय.मध्ये विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू सुरू झाले. आमचे कॉलेज उत्तम रँकिंगचे असल्याने अनेक मोठ्या कंपन्या नोकरी देण्यासाठी येऊ लागल्या. त्यावेळी व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनियर होणाऱ्या मुलांच्या खिशात दोन ते तीन कंपन्यांची अपॉईंटमेंट लेटर्स असत. एकंदरीत उत्तम नोकरी मिळणे त्यावेळी बरेच सोपे होते. निदान आमच्या कॉलेजसाठी तरी. एम.आय.डी.सी. च्या सरकारी नोकरीसाठी मी निवडलो गेलो आणि त्यानंतर एका इंटरनॅशनल […]
उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा… […]
‘रोजची पहाट’ या लोकप्रिय दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट श्री. सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख वार्ताहर, मुलाखतज्ञ श्री. काका सरधोपट यांची फार आतुरतेने वाट पाहत होते. कुणाचीही आणि कसलीही मुलाखत असो तिची चुटकसरशी वाट लावण्यात म्हणजे आटोपण्यात काकांचा हातखंडा होता. सध्या ऐरणीवर असलेल्या धडाकेबाज ज्वलंत समस्येवर साधकबाधक चर्चा करणारा असा एक धडाकेबाज दिवाळी विशेषांक काढायची सूर्याजीरावांची योजना होती. […]
सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड […]
ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय. […]