चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या. […]
एकूण या तिन्ही मान्यवरांनी मला रियाजाकडे वळविले. पण एखादी गोष्ट जोरात सुरू होण्यासाठी एखादा जोरदार धक्का लागतो. माझे वडील चिंतामण जोशी हे निवडणूक जिंकून लायन्स क्लब इंटरनॅशनलचे मुंबईचे गव्हर्नर म्हणून निवडून झाले. त्यांचा शपथविधी समारंभ अमेरिकेत होणार असल्याने ते आणि माझी आई असे दोघेही अमेरिकेला गेले. मी एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण घर पुढील २५ दिवसांसाठी […]
कृष्णा सरीन नावाची एकोणीस वर्षांची लखनौमधील मुलगी, आई-वडील आपल्याला टॅलेंट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईला जाऊ देत नाही म्हणून दिवसभर उपाशी राहिली.. शेवटी तिला परवानगी मिळाली व ती मुंबईला पोहोचली. त्या स्पर्धेत, ती यशस्वी झाली व तिला पहिला चित्रपटही मिळाला.. व त्याचे मानधन हे पारितोषिक स्वरुपात होते, तब्बल २५ हजार रुपये!!! […]
लेण्यांची उंची आणि खोलवर उतरणाऱ्या पायऱ्यांकडे आता कुठे मनोजसरांचे लक्ष गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांची चलबिचल सुरू झाली, ते परतायची घाई करू लागले, म्हणाले, “अरे, तो भत्ता बित्ता राहू द्या आता, आपण आधी खाली उतरू. मग निपट निरंजनच्या मठात हवं तर खाऊ भत्ता, पण आता निघायचं. चला चला!’ “सर, तोपर्यंत फार उशीर होईल. आम्हाला […]
पाच वर्षांपूर्वी माझं संपूर्ण आयुष्यच बदलणारी गोष्ट घडली. इतरांनाही त्यापासून कांही धडा घेता यावा म्हणून मी हे लिहितोय. मी जेव्हां अगदी तरूण होतो तेव्हां साहित्यसेवा करायचे ठरवले. साहित्यातील पदवी घेतल्यानंतर बरेच वर्षे फारसा मोबदला न मिळता मेहनत करत राहिल्यानंतर, मी लेखक म्हणून थोडासा स्थिरस्थावर व्हायला लागलो होतो. अनेक नियतकालिकांच्या संपादकांना आता माझे नांव माहित झाले होते […]
३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या […]
पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते. पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ घालून खणाची साडी नेसवली जाते. दोन्ही बाजुच्या कडेला पाच बांगड्या अडकवून. मंगळसुत्र एखाद्या दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते. मग यथासांग पुजा करुन गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो. समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते. कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते.आज आमच्या घरी सून बाईंनी चैत्र गौरीची पुजा केली आहे. […]
साठच्या दशकात कुर्ल्यातल्या माळरानावर आम्ही राहायला आलो तेव्हा माझ्या बाबांनी जागा घेऊन तेथे एक चाळ बांधली होती. मुंबईत कधी काळी माळरानेही अस्तित्वात होती हे वाचून खरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सभोवार उघडे माळरान आणि आसपास काही चाळी. […]
फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत […]