नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

एक सांगीतिक प्रवास

“मुक्काम पोस्ट १०००”  या माझ्या – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने माझी पत्नी सौ प्रियांका जोशी यांनी लिहिलेली ही कविता… हे तिचं मनोगतच… […]

दोन घडीचा डाव

‘ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या.. […]

निपटारा – भाग  4

मालशे मॅडम म्हणजे आमच्या फिजिकल ट्रेनर आणि स्पोर्टस् विभाग प्रमुख. खूप सिनियर. पण उत्साह दांडगा. ट्रेकिंग कँप, पिकनिक वगैरे प्रोग्रॅम त्यांच्या खास आवडीचे. विद्यार्थ्यांमध्ये जाम पॉप्युलर. पण दिवाळीच्या सुटीमध्ये त्यांचे येणे जरा अवघडच वाटत होते. आमची योजना बारगळते की काय असे वाटले. पण त्या लगेच तयार झाल्या. अर्थात त्या आल्यामुळेच आमच्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता होतीच. […]

आईच्या बांगड्या

क्रांतीच्या वेळी आई मुलाला म्हणाली वाणाचं सामान आणायचे आहे पैसे देतोस का मुलानी काही रुपये काढून दिले. अरे आणखीन थोडे देतोस का बांगड्या भरायच्या आहेत मला. बांगड्या आहेत ना हातात. आई मान खाली घालून गप्प. आणि तसेही बांगड्या घातल्या शिवाय सण साजरा होत नाही का? आई मुकाट्याने बाहेर गेली. तोच चला मी तयार आहे मला साडी घ्यायची आहे सणासाठी. आणि आई थोड्याच दिवसा नतंर बांगड्या न भरताच या जगातून निघून गेली. […]

नशीब

एखादी किरकोळ गोष्टही कधी मनासारखी घडली नाही की आपण लगेचच नशीबाला दोष देतो. आपण सोडून इतर सर्वांना नशीब भरभरुन साद देतं. मात्र आपल्या वाटेला वणवण पाचवीलाच पूजलेली, असं सर्वांनाच वाटतं! दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचं नातं थेट नशीबाशीच जोडलेलं असतं का? आणि संपूर्ण आयुष्य नशीबाला दोष देत रडतखडत जगणं कितपत योग्य आहे याचा कधीतरी विचार नको […]

गझल गायनाला शुभारंभ

लवकरच रेडिओवर तीन मराठी गाणी सादर करण्याचे कॉन्ट्रॅक्ट माझ्या घरी आले आणि गाणी घेऊन मी रेडिओच्या ऑफिसमध्ये गेलो. संगीतकार भूमानंद बोगम यांची भेट झाली आणि या पूर्वी कोणत्याही कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी सादर करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नवीन गाणी मिळवण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली आणि मला एकदम आठवण झाली संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या […]

होके मजबूर मुझे

१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. […]

निपटारा – भाग  3

दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना. मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, […]

त्यांच्या तत्त्वाच्या प्रकाशात

प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो. […]

रथसप्तमी आहे आंनदाची

रथसप्तमीला संक्रांतीच्या हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमाची सांगता होते. आज सूर्य रथात बसून जात आहे अशी रांगोळी काढून त्यासमोरील बाजूस गोवरीच्या खांडावर छोट्या मातीच्या सुगड्यात दूध उतू घातले जाते आणि ते पूर्वेकडील बाजूस उतू जाणे शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशीचे औचित्य साधून लेकीने घरसजावटी बरोबरच सूर्य रथाची आरास केली आहे. […]

1 153 154 155 156 157 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..