पुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात […]
जिवा कापरे तुरूंगाच्या बुट बनवण्याच्या भागांत काम करण्यांत गुंग होता. एवढ्यांत तुरूंगाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व त्याने त्याला एक महत्त्वाचा कागद दिला. जिवाची तुरूंगातून सुटका झाल्याचा हुकुम होता तो. जिवाने तो कागद फार उत्सुकता किंवा आनंद न दाखवतां घेतला. त्याला चार वर्षांची सजा झाली होती. तो आतापर्यंत दहा महिने राहीला होता. आपण तीन महिन्यातच सुटू […]
स्वाभिमान हा माणसाचा एक जन्मजात गुण आहे. प्रत्येकात असतोच. आणि असावाही. पण अतिरेक झाला की ते फारच असह्य होते. आणि जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा खूप खूप वाईट वाटते अशावेळी सयंम ठेवावा लागतो नाही तर भयंकर वाईट प्रसंग येतात. तर कधी कधी आपल्यालाच मनाला मुरड घालून गप्प बसावे लागते. […]
बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. […]
मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली. […]
एकाच प्रसंगाच्या आसपास दोन सुंदर रचना ऐकायला मिळाल्या. पूर्वापार ऐकत आलोय तरीही तू-नळीच्या कृपेने एकीचा चक्क भावपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला. प्रसंग समांतर भावनांना वेढून उरलेला आणि दोन्ही गायिका, दोन्ही गीतकार,दोन्ही संगीतकार एकाच तोलामोलाचे आहेत म्हणून की काय उन्नीस-बीस करायला मन धजावत नाही. […]
खिद्रापूर – सांगलीपासून सुमारे ५१ किमी अंतरावर, नृसिंहवाडीपासून जवळ ! फार पूर्वी गेलो होतो पण आताची नजर जरा वेगळी होती. राष्ट्रीय वारसा, पण बऱ्यापैकी दुर्लक्षित ! […]
आ मच्या घराजवळच श्री घंटाळी देवीचे प्रसिद्ध मंदिर होते आणि मंदिराला लागूनच घंटाळी मैदान होते. घंटाळी मित्र मंडळ नावाची संस्था सुप्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम या मैदानात सादर करीत असे. आज सर्वांना परिचित असलेले योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, श्री.रेडकर आणि इतर अनेक मंडळी यात कार्यरत होती. हे कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असत. या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे कार्यक्रम अगदी वेळेत […]
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक. […]
मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली. थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर […]