नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मन रामरंगी रंगले

आमच्या गावी गणपतीच्या दिवशी संध्याकाळी गावातले सर्व गावकरी भजनासाठी जमतात. गावकरी येण्याआधी आम्ही सर्व तयारीनिशी सिद्ध राहतो. समोरच्या देवखोलीत सुशोभित आसनावर गणपतीची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली असते. मूर्तीच्या पाठीमागे दिव्यांची आरास झगमगत असते. समोर निरांजनातील दिवे उजळून निघालेले असतात. देवखोली समोरील ओसरीत मनमोहक रांगोळ्यांवर समयी ठेवलेल्या असतात. हातात टाळ, झांजा घेऊन गावकरी येतात. पायपेटी स्थिरस्थावर होते. […]

पराधीन आहे जगती

आता सामान्य माणूस किती दगदग करतो घड्याळाच्या तालावर नाचत धावपळ.प्रवास.काळजी. जबाबदारी आणि मग निवृत्ती. आजारपण. वार्धक्य हे सगळे चुकलेले नाही. देशासाठी लढणारा. तळहातावर जीव घेऊन परिस्थितीशी सामना करणारा सैनिक जायबंदी होतो आणि जन्मभर व्हिलचेअर. आणि म्हणतो कसा बचेंगे तो और भी लढेंगे.. […]

लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी

बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. […]

वेडेपणातलं शहाणपण

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण? […]

मी ना-कुमारी, ना-विवाहिता

मीनाकुमारीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘साहिब बीवी और गुलाम’ हा होता. तिला बारा चित्रपटांसाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं, त्यांपैकी चार चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला. तिला शायरी लिहिण्याचा छंद होता. तिच्या शायरीने भरलेल्या डायऱ्या आज गुलजारजींकडे शाबूत आहेत. […]

आंतरराष्ट्रीय योग दिन

आयुष मंत्रालयाने प्राणायाम व ध्यान यांचा समावेश असलेला ३३ मिनिटांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. योग दिनाचे ध्येय व उद्दिष्ट्ये सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट आहे. समाजातील सर्व थरांपर्यंत योगाचा प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने करणे, आवश्येक आहे. जनतेमध्ये योगाचा प्रचार व प्रसार करणे आणि […]

प्रतिकृती (कथा)-भाग-४

आता माझ्या मनात मानवी प्रतिकृती निर्माण करावी असे विचार येऊ लागले. जोपर्यंत उंदीर, सशांवर भागत होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण एखादा माणूस निर्माण करायचा ही फार गंभीर, धोकादायक आणि अवघड, जवळजवळ अशक्यप्रायच गोष्ट होती. यासाठी मला कुणीतरी विश्वासू मदतनीस लागणार होता. माझ्या शोधाची घरातच काय पण इतरत्रही कुणाला माहिती नव्हती. एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून कुणी […]

मराठीतील दादामुनी

१९७१ साली मी नटराज टाॅकीजला गजानन जहागिरदार दिग्दर्शित, ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा कृष्णधवल चित्रपट पाहिला. त्यामध्ये श्रीकांत मोघे व आशा पोतदार, प्रमुख भूमिकेत होते व एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत एक नवीन चेहरा पहिल्यांदाच दिसला. तेव्हाच मला खात्री पटली होती की, हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे. आणि घडलंही तसंच. आज त्या चित्रपटाला ५१ वर्षे पूर्ण झाली. […]

प्रतिकृती (कथा)-भाग-३

गावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर […]

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात. […]

1 161 162 163 164 165 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..