उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही. […]
दोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात. […]
दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय. […]
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. […]
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रणय आणि प्रगती काकांकडे गावी आले होते . रात्री जेवण झाल्यावर प्रणय, प्रगती व काकांची मुलं घराच्या अंगणात घोंगडीवर गप्पा मारत बसायची . तेव्हा त्यांचे विजूकाका त्यांना विज्ञानाच्या छान छान गमती जमतीच्या गोष्टी सांगायचे . मुलांना खूप मजा वाटायची . असेच एका रात्री विजू काका मुलांना गोष्टी सांगत असताना अचानक घराच्या अंगणात मुलांना […]
दुपार झाली.रात्रीचे जागरण झाले होते तरी सर्वजण उत्साहात होते.बस आता सेल्युलर जेल च्या दिशेने निघाली होती.भोवतालचा परिसर निसर्गरम्य होता.मधेच कुठे वळणावर दिसणारा समुद्र शांत असल्याचे जाणवत होते.त्याचे भयकारी स्वरूप कसे असेल.मला त्सुनामी आठवली.पण यावेळी तिची आठवणही मी दूर भिरकावली. […]
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो. […]
शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा. […]