आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम. […]
दिवस जसेजसे जुने होऊ जातात तसतसा त्यांचेवर सोन्याचा मुलामा चढू लागतो. सारेच जुने सोने असते की नाही ठाऊक नाही, पण जुने दिवस निश्चितच सोनेरी असतात हा माझा आजपर्यंतचा शाश्वत अनुभव आहे. […]
१९२३ साली गिरगाव चौपाटीवर उभ्या राहिलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला, पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.. मुंबईत, या नव्याण्णव वर्षात आमूलाग्र बदल झाला. तरीही बदलला नाही, तो ताठ मानेनं उभा असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा.. शतकानुशतके तो सांगत राहिल… गाथा, एका ‘आयुष्याच्या मातीची’…. […]
कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात […]
अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये संपादिका सौ. विद्या नाले यांनी लिहिलेला ‘रम्य ते बालपण’ या लेखमालिकेचा परिचय. दोन शब्द… अनघाने गेले ४० वर्षे दिवाळी अंक देताना मराठी रसिकांची आवड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ४० वर्षांत धार्मिक अंक, विविध विषयांवर बेतलेले अंक तर काही वर्षी एखादा विषय देऊन मान्यवरांचे लेख मागविले होते. हा ४१ वा अंक […]
या चित्रपटाचं यश जातं, पटकथा-संवाद लिहिणाऱ्या अण्णा देऊळगावकरांना.. कथानक जरी उत्तम असलं तरी ते चुरचुरीत संवादांनी फुलवणं, हे काम अण्णांनी लीलया केलं. प्रेमा किरणचा हा पहिलाच चित्रपट होता.. तिला त्यांनी ‘अंबाक्का’ हे टिपिकल गावठी नाव दिलं.. तिच्या पहिल्याच एंट्रीला ‘काॅटन स्मिता’ असा लक्ष्याच्या तोंडी संवाद दिला.. सिल्क स्मिता ही दक्षिणेकडील हाॅट नायिका होती, ही महाराष्ट्रातील.. म्हणून ‘काॅटन स्मिता’! पहिल्याच चित्रपटात तिची व लक्ष्याची केमिस्ट्री जुळली व नंतर दोघांनी अनेक चित्रपटांतून धमाल कारकिर्द केली.. […]
सन २००५ आणि २००६ या कालावधीत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस असताना या शहराचा गाभा माझ्या अधिकार क्षेत्रात मोडत होता. रेल्वे स्टेशन ला लागून असलेला बी केबिनचा भाग, ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी,पाच पाखडी, चंदन वाडी, खोपट, चरई, उथळसर, कोलबाड इ. इ. […]
पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे.. […]
मी खोली तपासली. पलंगाखाली पाहिले कपाटात पाहिले. खिडकी तपासून पाहिली. दार आतून सर्व कड्या लावून घट्ट बंद केले. दाराशी एक टेबलही लावले. अंगावर रग ओढून पलंगावर झोपलो. मला समाधान वाटत होते की मी सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. माझा धनाने भरलेला रुमाल मी उशी खाली ठेवला. मला लौकरच लक्षांत आलं की मी झोपू शकत नव्हतो, इतकंच […]