वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून आलेली एक तरुणी आपल्या मित्राबरोबर गेल्या रविवारी शनिवार वाडा पहाण्यास पुण्यात आली. शनिवार वाडा पाहून झाल्यावर कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मित्राबरोबर रस्ता ओलांडताना, भरधाव आलेल्या बुलेटस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने दोघांनाही जोरदार धडक दिली.. परिणामी मित्र एका बाजूला व ती तरुणी दुसऱ्या बाजूला पडली.. मागून येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली ती आल्याने […]
मातृदिनाच्या दिवशी अनेकांनी लिहिलेल्या आठवणी वाचून मी खूपच अस्वस्थ झाले होते. आई होती पण तिची माया प्रेम मिळाले नाही. बाकीच्या गोष्टी नाहीच. असो मला लिहायला जमले नाही म्हणून आईचे उपकार कधीच विसरणार नाही. उलट मीच तिला समजून घेतले नाही. याचेच खूप खूप वाईट वाटते. तिला व्यक्त होता आले नाही म्हणून तिची माया प्रेम कमी होती असे नाही. परिस्थितीने ती हतबल होती. पण तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आयुष्यात खूप काही करु शकले. […]
काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा. […]
यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा. रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा. वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित. त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला. नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं .. याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल. दादा-वहिनी म्हणा हवं तर .. पण हा गेले काही दिवस बघतोय […]
खरं तर त्यांच्या प्रत्येक कथेवर चित्रपट निर्मिती होऊ शकते.. मात्र तसं काही फारसं प्रत्यक्षात घडलं नाही. त्यांच्या साहित्यावर इनमीन, तीनच मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.. १९७० साली वपुंच्या कथेवर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट, २०१२ साली त्यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर आधारित ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१५ साली वपुंच्या ‘बदली’ या कथेवरुन ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती झाली होती.. […]
जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जोडपं “गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन” बघण्यासाठी गेलं. तसं पूर्वी जाणं व्हायचं बरेचदा तेव्हा त्याचं इतकं काही कौतुक वाटायचं नाही पण या मधल्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे चार माणसांत फिरायला जाणं दुर्लभ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाला जाण्याचा आज एक वेगळाच उत्साह होता. त्याच आनंदात दोघेही आत शिरले. सगळे तसेच पूर्वीसारखे स्टॉल. तीच लगबग. अनेक महिन्यांनी जुनं चित्र डोळ्यासमोर बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. स्टॉलच्या दोन रांगांमधलं किंचितसं वाढलेलं अंतर आणि काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पूर्वीसारखंच . […]
दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते. […]
बिंदूने १९८५ सालापर्यंत अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातील ‘इम्तिहान’, ‘हवस’, ‘कामशास्त्र’ चित्रपटातील भूमिका व्हॅम्पीश होत्या. ‘अभिमान’, ‘अमरप्रेम’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका, दुसऱ्या टोकाच्या होत्या. ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटांतून तिने मावशी, आत्याच्या भूमिका केल्या. आजवर २०० हून अधिक चित्रपटात कामे करुन तिने आता चित्रसंन्यास घेतलेला आहे. तिच्या भूमिकांचं कौतुकही झालं, मात्र सात वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळूनही, तो पुरस्कार काही तिला मिळाला नाही.. […]
न. प. शा. क्रमांक अकरा समतानगर उस्मानाबाद येथील शाळेत मी मुख्याध्यापिका म्हणून रुजु झाल्या पासून त्यांना अगदी जवळून पाहिले. नवीन शाळा सुरू करण्यात आली होती म्हणून मैदानात काही रोपे लावली होती आणि कुंभार सर शाळेत लवकर येऊन झाडांना पाणी घालणे. आळे करणे कामे करीत असत. अगदी याच अपेक्षेने मुलांना घडवत असत. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पण दुसरे कोणतेही विषय दिले तरी नाही म्हणणार नाहीत. तिथेही मुलांना कमी पडू दिले नाही. कधीही घरगुती कारण सांगून काम टाळले नाही. साधा राहणी आणि उच्च विचारसरणी. […]