पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं. […]
सरांना पुण्यात कोथरुड येथे येऊन चार वर्षे झालेली आहेत. सरांच्या रोजच्या पोस्ट वाचणारे वाचक असंख्य आहेत, मात्र ती वाचून व्यक्त होणारे, बोटांवर मोजण्याइतकेच.. ही खंत कुलकर्णी सरांनी अनेकदा फेसबुकवर व्यक्त केली.. आता मी लेखन बंद करणार असेही जाहीर केले.. अशावेळी अनेकांनी पोस्ट लिहिणं बंद करु नका, अशी विनवणी केली.. सरांनी पोस्ट लिहिणं चालू ठेवलं… […]
कधीही कुठेही जायचे झाले की बस मधून जावे लागत असे. तिकीट काढून सगळे जागेवर बसले आणि खात्री करून वाहक दोरी ओढून चला असा संकेत देतात. प्रवासी आपापल्या परीने जेवण. झोप. गप्पा. वाचन. आणि आता मोबाईल फोन वगैरे मध्ये गुंगतात. पण त्याला मात्र एकाच जागी बसून लक्ष केंद्रित करुन अगदी जागरूक पणे जबाबदारी पार पाडावी लागते. आपल्या इच्छित स्थळी प्रवासी उतरतात चढतात. त्यामुळे इथेही तो जागरूक असतो. […]
मेजर शिंदे यांच्या घरी रात्रभर पत्त्यांचा जुगार चालू होता. सकाळी पांच वाजतां नाश्ता दिला गेला. तोपर्यंत जिंकलेल्यांनी तो खूप आवडीने खाल्ला तर हरणाऱ्यांच्या तोंडाची चव गेली होती. एकजण म्हणाला, “माझं नशीब जुगारांत नेहमीच दगा देतं.” एकाने दुसऱ्या एका इंजिनीअर्सच्या तुकडीतील हरीरामला विचारले, “हरीराम, आश्चर्य आहे ! तू कधीही पत्त्यांना हातही लावत नाहीस ! तरीही तू आमच्याबरोबर […]
कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो. […]
मित्रहो, नमस्कार क्रोध, राग, संताप, द्वेष, तिरस्कार, कुचेष्टा, निर्भत्सना, निंदा, मत्सर, अशा गोष्टी मानवी जीवनात अशांतता निर्माण करतात. मानवाला अस्वस्थ करतात. मानवाच्या विवेकबुद्धीला आव्हान देतात. मानवी प्रकृती ही मूलतः पंचतत्वानी म्हणजे पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायु बनली आहे हे सर्वश्रुत आहे. मानवी जीवनात सुखी जीवनासाठी चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगितले असून सात्विक परमोच्च […]
‘चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!! […]
या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. […]
हा गायक -संगीतकार ओरिजिनल होता, जी एक विलक्षण आणि अविश्वसनीय बाब आहे या चित्रसृष्टीत ! भलेही इतरांनी त्याचे अनुकरण केले असो. पण हा मात्र एकांडा शिलेदार ! त्याची २-३ वैशिष्ट्ये ! […]
हा जीवनातील सर्व सद्गुणातील एक मानसिक स्वास्थ्य देणारा सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे. प्रत्येकाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक क्षण हा संस्मरणीय आहे. आणि अशा जीवन प्रवासात जगतांना आपल्याला अगदी कळतय अशा शिशुशैशवास्थे पासून जन्मदात्यांचे , नातेवाइकांचे , गुरुजनांचे , शेजारीपाजाऱ्यांचे , मित्रसहकाऱ्यांचे अनमोल असे योगदान लाभलेले असते. त्यामुळे आपले जीवन अगदी सुखद समृद्ध झालेले असते ही वास्तवता कुणीही नाकारु […]