‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’ नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर […]
संक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात. […]
लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं. […]
एक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या. […]
सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती. […]
एका शिक्षिकेचा वर्गावर क्लास चालू होता. आज ती मुलांना काहीतरी नवीन शिकवणार होती. तिने नऊचा पाढा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो असा : 9×1 = 7 9×2 = 18 9×3 = 27 9×4 = 36 9×5 = 45 9×6 = 54 9×7 = 63 9×8 = 72 9×9 = 81 9×10 = 90 शिक्षिका फळ्यावर लिहित […]
एका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘ […]
असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो. […]