बीटवरचा हवालदार मोठ्या तत्परतेनं आपलं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चं काम बजावत रस्त्यावर गस्त घालत होता. त्याची ही तत्परता कोणाला दाखवावी म्हणून नव्हती हे नक्की ! कारण रस्त्यावर रहदारीच नव्हती. रात्रीचे दहाच वाजत आले होते. पण कडाक्याची थंडी आणि बोचरं वारं या दोघांनी मिळून लोकाना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त केलं होतं हे खरं. […]
गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं. […]
चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील. […]
कुर्ला टर्मिनसला लिफ्टची कुठे सोय आहे का बघतच होतो की, आमच्यासमोर बॅटरी ऑपरेटेड ट्रॉली येऊन थांबली. आईला बघूनच तो आला असणार. आम्ही सामान आणि आईला घेऊन त्यात बसलो आणि त्यानेही इतके अलगद आम्हाला आमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या डब्यापर्यंत आणून सोडले आणि सामानही आत चढवून सीट खाली लावून दिलं. […]
जेकबज् हा त्याच्या काळांत विनोदी प्रहसन म्हणजे फार्स लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. तो अधूनमधून भय कथा लिहित असे. आजही तो “मंकीज पॉ” ह्या भयकथेसाठीच प्रसिध्द आहे. माणूस एखादी इच्छा करतो पण ती पूर्ण झाली तर परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. ही कथा सुपरनॕचरल प्रकारांत मोडते. त्याने बऱ्याच कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. त्यापैकी कांहीवर चित्रपटही आले. मंकीज पॉ ह्या कथेवर चित्रपट, नाटक, टीव्ही, इ. सर्व माध्यमांतून अनेक आविष्कार आले. मूळ इंग्रजी कथा ३८००हून अधिक शब्दांत लिहिलेली आहे. मी तिचं मराठी रूपांतर साधारण २३०० शब्दांत केलं आहे. […]
माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत. […]
मग १९७० च्या “ट्रक ड्रायव्हर” या अनामिक चित्रपटात ( मी मनाच्या भूतकाळात हे नांव आणि गाणंही विसरून गेलो होतो. परवा “वेदांतश्री” च्या वासंतिक अंकात लताबद्दल लेख वाचताना अचानक तळाशी जाऊन बसलेले हे गाणे- “कान्हा रे कान्हा, तूने लाखो रास रचाए” उसळून वर आले) त्याची आगळीक नव्याने भेटली. […]
१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी […]