ठाणे जिल्ह्याची पत्रकारिता ही तब्बल दिडशे वर्षांची जुनी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ठाणे जिल्ह्याचे पहिले ज्ञात मराठी साप्ताहिक म्हणून ‘अरुणोदय’ वृत्तपत्राचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्य मिळण्याच्या ८१ वर्ष आधी आणि मुंबईत मराठी वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जवळपास ३४ वर्षांनी ठाणे शहरात पहिले वृत्तपत्र सुरू झाले. काशिनाथ विष्णू फडके यांनी हे पत्र सुरू केले. २२ जुलै १८६६ रोजी पहिला अंक प्रसिद्ध झाला. […]
चिमणी चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरी भागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे […]
संध्याकाळची वेळ, बाहेर अंधारून आलेले. जोरात पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो. बशी भरून चिवडा आणि चहाचा मग भरून ठेवून, आमची ही बाहेर गेली होती. चिरंजीव राहूल ऑफिसमधून यायला अजून दोन एक तासांचा वेळ होता. त्यामुळे तास दोन तास निवांतपणे मला माझ्या भाषणाची तयारी करता […]
विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता. तो अफजलखानाने उचलला. त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच. तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही. मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं. महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत. प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे. प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही. पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो. पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं. त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो. […]
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला ज्येष्ठ इतिहास संशोधक दाऊद दळवी यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. ठाण्यातील सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीला अव्वल इंग्रजी आमदनीपासून सुरुवात झाली. इंग्रजी भाषा व पाश्चात्त्य शिक्षण यामुळे त्या काळातील तरुण सुशिक्षित वर्गात वैचारिक क्रांती आली. अंधश्रद्धा, […]
दूरदर्शन सुरु झाल्यावर आम्ही ‘अपट्राॅन’ कंपनीचा कृष्णधवल पोर्टेबल टीव्ही घरी आणला होता. त्याकाळी संध्याकाळच्या बातम्या आवर्जून बघितल्या जात असत. तेव्हा वासंती वर्तक हमखास दिसायच्या.. टिपिकल साडी आणि नाममात्र मेकअपमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. त्याआधी मित्रांच्या घरी जाऊन टीव्ही बघताना, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांना बातम्या देताना अनेकदा पाहिलेलं होतं. […]
अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त कथा. लेखक श्री. रवींद्र वाळिंबे अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये श्री. रवींद्र वाळिंबे यांनी लिहिलेली ही कथा. सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो […]
आज सर्वत्र कृत्रिम धागे आणि दो-या यांचाच काळ आहे. सर्व कामासाठी नायलॉनच्या दो-यांचा वापर होत आहे,पण एक काळ होता जेंव्हा शेतातील कामासाठी नैसर्गिक धाग्यापासून बनलेल्या दोरीचा वापर व्हायचा.अंबाड्याच्या बट्ट्यापासून दोर वळायचे….गावोगावी वट्यावर म्हातारी माणसे दो-या वळत बसलेले दिसायचे. […]
‘अग, पण हे चांगलं आहे का? मतदानासाठी लाच? छे, छे, मला नाही पटत.’ ‘अहो, आपण काही फुकट नाही घ्यायचं, पैसे देऊ त्यांना. आपल्याकडे मनुष्यबळ नव्हते म्हणून तर आपण घरच्याघरी करणार होतो ना? मग त्यांना संधी द्यायची तशी आपणही थोडी संधी साधली तर का बिघडलं?’ ‘चल, तूम्हणतेस तर घेऊ संधी. पण काही ओळख ना पाळख, काही घोटाळा […]
मराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे. […]