नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

सर्पदंश

सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]

मंगलाय सुमनो हरि:

मंडळी सप्रे म नमस्कार ! शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला ! मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली […]

सायकल – तेव्हाची व आत्ताची

१९६०-६५ चा काळ या काळी स्वतःची सायकल असणे म्हणजे आताच्या काळातील मर्सिडीसची एसयूव्ही कारमालकाशीच बरोबरी होण्याचा काळ.आश्या काळी एके दिवशी वडील नवी कोरी सायकल हाताने ढकलत घेऊन घरी आले.ती सायकल पहाताच आईचा पाराच चढला.” स्वतःला सायकल चालवता येत नाही आसला जाहागीरदारी डोहाळ कसे काय लागले तुम्हाला. […]

मातृदिन

मुलींच्या शाळेत मातृदिनाची लगबग चालली होती. मुली, शिक्षिका सगळेच उत्साही होते. सगळ्यांनी मिळून शाळा स्वच्छ केली. जिकडे तिकडे आरास केली. आजचा दिवस आईला वंदना देण्याचा होता. सगळ्यांची उत्सुकता ही होती की मुख्याध्यापिका कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविणार. […]

गम्मत एका देवळातील

गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते. […]

गुलाबी रिबिन

एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते. […]

वीर सावरकर – स्वातंत्र्य क्रांतिकारकाचे महामेरू

सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील,गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला. […]

रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर

रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्‍या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्‍या पद्धतीने दिग्दर्शित करणार्‍या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे! […]

मृत्युंजय स्वा. सावरकर

दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्‍ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते. […]

लाले दी जान !

समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते. […]

1 18 19 20 21 22 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..