पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. […]
रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून. […]
मला वाडा ह्या प्रकारच प्रचंड कुतूहल आहे. वाडा हा गावं आणि लहान शहर याचा अविभाज्य अंग असतो .वाडे नाहीत असे गावं किवा लहान शहर सापडत नसे वाडा हा नुसता नसून त्याला स्वताची ओळख असते.. […]
— मी कुठं आहे तेच कळत नाही . शरीराची तडफड होते आहे . शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय . डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय. गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत . पब्लिकची गर्दी जाणवतेय . आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय . काहीतरी घडलंय . पब मधून येताना लाँग […]
सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]
मंडळी सप्रे म नमस्कार ! शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला ! मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली […]
१९६०-६५ चा काळ या काळी स्वतःची सायकल असणे म्हणजे आताच्या काळातील मर्सिडीसची एसयूव्ही कारमालकाशीच बरोबरी होण्याचा काळ.आश्या काळी एके दिवशी वडील नवी कोरी सायकल हाताने ढकलत घेऊन घरी आले.ती सायकल पहाताच आईचा पाराच चढला.” स्वतःला सायकल चालवता येत नाही आसला जाहागीरदारी डोहाळ कसे काय लागले तुम्हाला. […]
मुलींच्या शाळेत मातृदिनाची लगबग चालली होती. मुली, शिक्षिका सगळेच उत्साही होते. सगळ्यांनी मिळून शाळा स्वच्छ केली. जिकडे तिकडे आरास केली. आजचा दिवस आईला वंदना देण्याचा होता. सगळ्यांची उत्सुकता ही होती की मुख्याध्यापिका कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविणार. […]